Pune Crime News | कलयुग ! सख्या भावाने अत्याचार करुन 14 वर्षाच्या बहिणीला केले गर्भवती; मुलीने दिला बाळाला जन्म

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | एकाच घरात राहणारे ते दोघे सख्ये भाऊ बहिण़ मोठ्या भावाने आपल्या १४ वर्षाच्या बहिणीवर वारंवार लैगिक अत्याचार (Sexual Abuse) केला. त्यातून या मुलीने एका बाळाला जन्म दिला. (Pune Crime News)

याबाबत या मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४६६/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी २४ वर्षाच्या मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील एक वर्षांपासून सुरु होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हे कुटुंब मुळचे कर्नाटक येथील राहणारे आहे. फिर्यादी या धुणे भांड्यांची कामे करतात.
त्यांचे पती व २४ वर्षाचा मुलगा वॉचमन म्हणून काम करतात. ही मुलगी शाळा शिकते.
ते घरी असताना मोठ्या भावाने या मुलीवर वारंवार लैगिक अत्याचार केला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. परंतु, तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. मंगळवारी तिच्या पोटात दुखायला लागले. तेव्हा तिला रुग्णालयात नेले. तेथे ही मुलगी गर्भवती असून तिला प्रसृती कळा येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर काही वेळातच तिने एका बाळाला जन्म दिला. पोलिसांनी मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शितोळे (PSI Shitole) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Milk Tea Side Effects | पिऊ नये दुधाचा चहा, शरीरात निर्माण होऊ शकतात या ७ गंभीर समस्या

Healthy Oils | कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठी जेवणात या ५ निरोगी तेलांचा करा वापर

Low Weight | वजन कमी झाल्याने सुद्धा वाढू शकतात आनेक समस्या, ऑस्टियोपोरोसिस, अ‍ॅनीमियासह होऊ शकतात हे 5 रोग