Pune Police MCOCA Action | विमानतळ परिसरात दहशत माजवणाऱ्या चिक्या गायकवाड व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 52 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत हातगाडी लावणाऱ्यांना दमदाटी करुन जबरदस्तीने पैसे लुटणाऱ्या प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड व त्याच्या इतर दोन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 52 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

टोळी प्रमुख प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड (वय-25 रा. महादेवनगर, वडगाव शेरी, पुणे), अरबाज अयुब पटेल (वय-24 रा. नागपुर चाळ, येरवडा), बबलु संतोष चव्हाण (वय-22 रा. संजय पार्क, विमाननगर, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी हातगाडी लावणाऱ्या विक्रेत्याला दमदाटी करुन गल्ल्यातील तीन हजार रुपये जरदस्तीने काढून नेले होते. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आयपीसी 392, 352, 427, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून टोळी प्रमुख चिक्या गायकवाड याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. तर अरबाज पटेल याच्यावर 6 आणि बबलु चव्हाण याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व तसेच दहशत निर्माण करण्यासाठी गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, घातक शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव (Pune Police MCOCA Action) करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) करीत आहेत.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 52 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Senior PI Vilas Sonde), पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता माळी (PI Sangita Mali),
सहायक पोलीस निरीक्षक मिलींद पाठक (API Milind Pathak), पोलीस उपनिरीक्षक एस.एस. कोळ्ळुरे (PSI S.S. Kollure),
पोलीस अंमलदार उमेश धेंडे, भोर, शिंदे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Big relief for IPS Rashmi Shukla, case related disclosure of confidential report closed

Pune: Deadline for submitting applications to regularise gunthewari constructions may be extended

Bank Holiday In September 2023 | सणांमुळे सप्टेंबर महिन्यात राहणार अनेक दिवस बॅंका बंद; जाणून घ्या बॅंकेचे वेळापत्रक