Pune Police MCOCA Action | मुंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या मंगेश तांबे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 107 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | हॉटेलच्या बीलावरुन शिवीगाळ करत असताना शिवीगाळ करु नका येथे महिला आहेत, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी बिअरच्या बाटलीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) करत परिसरात दहशत माजवली. या गुन्ह्यातील आरोपी मंगेश तांबे व त्याच्या इतर दोन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 107 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) आयपीसी 307, 336, 352, 504, 506, 427, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी टोळी प्रमुख मंगेश बाळासाहेब तांबे (वय-28 रा. खराडकर पार्क, खराडी), अक्षय कुंदन गागडे (वय-24 रा. केशवनगर मुंढवा), कार्तिक भरत गुमाणे (वय-20 रा. गायरान वस्ती, मुंढवा) यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने अक्षय गाडगे व कार्तिक गुमाणे यांना अटक केली आहे. हा प्रकार 10 डिसेंबर रोजी रात्री धायरकर वस्ती येथील हॉटेल मध्ये घडला होता.

मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा (Pune Police MCOCA Action) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास हडपसर विभागाचे (Hadapsar Division)
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे (सह पोलीस आयुक्त अतिरिक्त कार्यभार)
रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा (DCP R Raja),
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Sr PI Vishnu Tamhane),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिता रोकडे (PI Sunita Rokde),
तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor),
पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड (PSI Sadashiv Gaikwad),
पोलीस अंमलदार हेमंत झुरुंगे, दीपक कांबळे, रविंद्र देवढे, विजय माने यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अपघातानंतर पळून गेल्यास १० वर्ष शिक्षा; राज्यात ठिकठिकाणी ट्रक चालक उतरले रस्त्यावर

हिट अँड रन काय आहे नवा कायदा; भारतीय न्याय संहिता २०२३ समज गैरसमज

धक्का लागल्याच्या कारणावरुन दगडाने मारहाण, एकाला अटक; मांजरी येथील घटना