New Motor Vehicle Act | हिट अँड रन काय आहे नवा कायदा; भारतीय न्याय संहिता २०२३ समज गैरसमज

पुणे : New Motor Vehicle Act | केंद्र सरकारने (Central Govt) नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) अनेक नवीन कायदे केले. त्यात भारतीय न्याय संहिता २०२३ हा कायदा संमत केला आहे त्यातील तरतुदीविषयी मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ट्रकचालक (Truck Driver), रिक्षाचालक (Rickshaw Driver) यांच्या असंतोष निर्माण झाला आहे. त्यातील हिट अँड रन (Hit and Run) विषयी अनेक गैरसमज आहेत. नेमका कायदा काय आहे. (New Motor Vehicle Act)

यापुढे चालकाकडून अपघात (Accident) झाल्यास त्याला १० वर्षे कारावास व ७ लाख रुपयांची शिक्षा असे नवीन प्रावधान या कायद्यात असल्याची अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. हे अत्यंत चुकीचे व खोटे विधान आहे.

हा पूर्णत: नवीन कायदा नसून वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि रॅश ड्रायव्हिंगमुळे अपघात झाला. त्यात कोणाचा मृत्यु झाला व तो झाल्यास चालक पळून गेला असल्यास त्याला हिट अँड रन केसेस असे म्हणतात. यामध्ये चालकाला २ वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंड असे प्राविधान या आधीपासूनच आहे.

नवीन संशोधनानुसार निष्काळजीपणे व बेजबाबदारपणे वाहन चालवून, वाहनचालक कोणाच्या मृत्युस जबाबदार ठरल्यास, त्याला ५ वर्षापर्यंतची शिक्षा प्रस्तावित आहे. तो वाहनचालक अपघातग्रस्त व्यक्तीला मृत्युच्या दारात सोडून, पोलिसांना न कळविता तसेच रुग्णालयात न नेता पळून गेल्यास व तसेच सिद्ध झाल्यास त्या चालकाला १० वर्षाची शिक्षा व ७ लाखांचा दंड ठोठावण्यात येईल.

जर का घडलेली घटना हा पूर्णत: अपघात असेल, वाहनचालकाने वाहन
निष्काळजीपणे किंवा बेजबाबदारीने चालवले गेले नसेल तर
अशा परिस्थितीत या शिक्षेचे प्रावधान नाही. (New Motor Vehicle Act)

परंतु, परवाना नसताना वाहन चालवणे, मद्यपान करुन वाहन चालवणे,
नो एंट्रीतून वाहन चालविणे, वेगमर्यादेचा भंग करुन वाहन चालवणे
अशा प्रकारच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे अपघात झाला असेल
आणि त्या परिस्थिीमध्ये वाहनचालक अपघातग्रस्त व्यक्तीला मृत्युच्या दारात सोडून पळून गेला असेल
आणि त्यांनी पोलिसांना कळवले नसेल तर त्याचा समावेश सीआरपीसी ३०४
अ मध्ये होईल व तरच या शिक्षेचे प्रावधान करण्यात आलेले आहे.
हा कायदा अजून लागू करण्यात आलेला नाही.
१ एप्रिल २०२३ पासून त्यांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

धक्का लागल्याच्या कारणावरुन दगडाने मारहाण, एकाला अटक; मांजरी येथील घटना

खासगी सावकाराच्या त्रासाला वैतागून तरुणाची आत्महत्या, सोमवार पेठेतील घटना; महिलेसह दोघांवर FIR