Pune Police MCOCA Action | गोळीबार करुन तरुणाला जखमी करणाऱ्या टेड्या सातपुते व त्याच्या इतर 4 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 42 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने गोळीबार (Firing In Pune) करुन जखमी करणाऱ्या सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ टेड्या सातपुते याच्यासह त्याच्या इतर चार साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 42 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

फिर्यादी हे 17 जुलै रोजी रामनगर (Ramnagar) येथील जय भवानी चौकात त्यांच्या घरासमोरील रोडवर क्रिकेट खेळत होते. त्यावेळी आरोपींनी फिर्याद यांना बोलावून घेत शिवीगाळ करुन आज तुला खल्लासच करतो असे म्हणत त्यांच्यावर बंदूक रोखली. त्यावेळी फिर्यादी यांनी बंदुक (Gun) हाताने वळवल्याने जमिनीवर गोळीबार झाला. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये एक गोळी फिर्यादी यांच्या कमरेला लागल्याने ते गंभीर जखमी झाली. अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) आयपीसी 307,34 आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police MCOCA Action)

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी हा गुन्हा पुर्ववैमनस्यासातून ओंकार उर्फ टेड्या उमेश सातपुते (वय-23 रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी) व वीर फकीरा युवराज कांबळे (वय-22 रा. शिवणे, पुणे) यांच्या सांगण्यावरुन पूर्वनियोजित कट रचून केल्याचे समजले. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यात आयपीसी (IPC) 120 (ब) व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अॅक्टचे (Juvenile Justice (Care and Protection of Children) Act) कलम वाढवण्यात आले.

याप्रकरणी ओंकार उर्फ टेड्या सातपुते याला अटक (Arrest) करुन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर वीर कांबळे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपी सातपुते याने संघटीत टोळी तयार करुन खूनाचा प्रयत्न (Attempted Murder), दरोडा (Robbery), गुन्हा करण्यासाठी कट रचणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देणे, दुखापत करणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे असे गुन्हे वारंवार केले आहेत.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil) यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास कोथरुड विभागाचे (ACP Kothrud Division) सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) करीत आहेत.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 42 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार,
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma),
सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Senior PI Sunil Jaitapurkar),
पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni),
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल मिंडे (PSI Vishal Minde),
पोलीस अंमलदार संभाजी दराडे, विजय खिलारी, नितीन कातुर्डे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | दारु पिताना झालेल्या वादातून भाच्याने केला मामाचा खून