Pune Police MCOCA Action | बोपोडी परिसरात दहशत निर्माण करणार्‍या तिघांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 37 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | बोपोडी परिसरात दहशत पसरवून नागरिकांना दमदाटी करणाऱ्या गणेश विष्णु अडागळे उर्फ सुंद्री गण्या व त्याच्या इतर दोन साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का अंतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 37 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

बोपोडी (Bopodi) येथे राहणारे आणि भाजीपाला विक्री करणारे फिर्यादी हे गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले होते. त्यावेळी गणेश आडागळे आणि त्याच्या साथीदारांनी पेट्रोल पंपावरील लाईन तोडून फिर्यादी यांच्या गाडीला धक्का दिला. याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन आरोपी गणेश विष्णु अडागळे उर्फ सुंद्री गण्या व त्याच्या साथीदारांनी धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. तसेच आपण या एरियाचे भाई असल्याचे सांगत सोबत आणलेल्या कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात वार केला. तसेच कोयते हवेत फिरवून पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आलेल्या नागरिकांना दमदाटी केली. ही घटना 30 जून रोजी बोपोडी येथील छाजेड पेट्रोल पंपावर (Chhajed Petrol Pump) घडली होती. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) आयपीसी 307, 323, 504, 506, 34, आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यात टोळी प्रमुख गणेश विष्णु अडागळे उर्फ सुंद्री गण्या Ganesha Vishnu Adagale aka Sundri Ganya (वय-20 रा. बापु काटे चाळ, दापोडी) याच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. टोळी प्रमुख हा सध्या येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आहे. तर अल्पवयीन मुलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपींवर वेळेवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यात काहीच सुधारणा झालेली नाही.

खडकी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (Pune Police MCOCA Action) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे (Senior PI Rajendra Sahane) यांनी परिमंडळ 4 पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 37 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, परिमंडळ 4 पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे,
सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग आरती बनसोडे (ACP Aarti Bansode)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे,
पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील (PI Mansingh Patil), पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ (PSI Anna Gunjal),
पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर (PSI Santosh Bhandwalkar),
सर्वेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार राजकिरण पवार व रमेश जाधव यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यात रस्त्यावरील वेश्या व्यवसायामुळे महिलांना चालणे झाले अवघड;
‘चलती क्या’ म्हणून पायी जाणार्‍या महिलेचा केला विनयभंग