Pune Police MCOCA Action | वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या विनोद सोमवंशी व त्याच्या 12 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 79 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | आंबेगाव खुर्द येथील किराणा माल विक्रेत्याने खंडणी (Extortion Case) न दिल्याने दुकानाची, वाहनांची तोडफोड करुन एकावर धारदार शस्त्राने वार करत दहशत पसरवणाऱ्या विनोद सुर्यवंशी व त्याच्या इतर 12 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 79 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) कायद्यान्वये कारवाई केली आहे.

फिर्यादी यांची आंबेगाव खुर्द येथे दोन मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेले किराणा मालाचे दुकान त्यांनी भाड्याने दिले आहे. विनोद सोमवंशीने साथीदारांना किराणा माल दुकानदाराकडून खंडणी घेण्यास सांगितले होते. किराणा माल विक्रेत्याने खंडणी देण्यास नकार दिल्याने सोमवंशी चिडला. त्यानंतर सोमवंशी आणि साथीदार किराणा माल दुकानात शिरले. दुकानाची तोडफोड करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

फिर्यादी यांनी मध्यस्थी केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या मुलाला मारहाण (Beating) करुन धारदार हत्याराने डोक्यात वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. तसेच फिर्यादी यांच्या दारावर खिडक्यांवर लाथा व दगडे मारुन पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) आयपीसी 307, 385, 387, 324, 452, 143, 144, 147, 148, 149, 323, 504, 506(2), 120(ब), 427, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट, बालन्याय (काळजी व संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपासा दरम्यान टोळी प्रमुख विनोद बालाजी सोमवंशी Vinod Balaji Somvanshi (वय-20 रा. जांभुळवाडी, दत्तनगर, पुणे) टोळी सदस्य आकाश गुलाबराव कांबळे (वय-21 रा. आंबेगाव खुर्द), आदीत्य विनोद नाईक (वय-23 रा. हनुमाननगर, आंबेगाव खुर्द), गोविंद बबन लोखंडे (वय-18), भुषण विनोद भांडवलकर (वय-19 दोघे रा. जांभुळवाडी रोड, कात्रज), प्रविण रामा गुडे (वय- 23 रा. कात्रज), अभषेक देविदास भगुरे (वय-18 रा. कात्रज) यांना अटक करण्यात आली असून ते सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerwada Central Jail) आहेत. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांचे इतर तीन साथीदार फरार आहेत. (Pune Police MCOCA Action)

आरोपी विनोद सोमवंशी याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी दरोडा, खंडणी, खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, गंभीर दुखापत करणे, मारामारी, विनापरवाना हत्यार बाळगणे, पिस्टल बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत पसरवणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी वारंवार अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3
(1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad)
यांनी परिमंडळ- 2 पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त
पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Patil) यांच्याकडे सादर केला. या अर्जाची छाननी करुन
अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास स्वारगेट विभागाचे
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर (ACP Narayan Shirgaonkar) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, परिमंडळ- 2 पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील,
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड,
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक (PI Vijay Puranik), पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीश दिघावकर (Girish Dighavkar),
सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर (API Kuldeep Vatkar), तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर,
सहायक पोलीस फौजदार चंद्रकांत माने, पोलीस अंमलदार नरेंद्र महांगरे, विशाल वारुळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tamannaah Bhatia Superbold Photo | पारंपारिक आणि मॉर्डनही… तमन्ना भाटीयाच्या व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लावली आग !

Pune Crime News | घोरपडी पेठ खून प्रकरणातील मुख्य आरोपीला खडक पोलिसांकडून अटक, 3 पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त