Pune Police MPDA Action | वानवडी परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई ! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत स्थानबध्दतेच्या 58 कारवाया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | वानवडी परिसरात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार मतीन हकीम सैय्यद (34, रा. सर्व्हे नं. 108/109, रामनगर, हडपसर, पुणे) याच्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) कारवाई केली आहे. त्याला वर्षभराकरिता नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) स्थानबध्द करण्यात आले आहे (Wanwadi Police Station). पोलिस आयुक्तांची ही 58 वी एमपीडीए अन्वये कारवाई आहे. (Pune Police MPDA Action)

मतीन हकीम सैय्यद हा त्याच्या साथीदारांसह वानवडी आणि हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोयता, गावठी पिस्टल, सुरा आणि लाकडी बांबु या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदेशीर अग्नीशस्त्र व हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. मागील 5 वर्षामध्ये त्याच्याविरूध्द 8 गुन्हे दाखल आहेत. (Pune Police MPDA Action)

सराईत गुन्हेगार मतीन हकीम सैय्यदच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे (Sr PI Sanjay Patange) यांच्या मतीन सैय्यद याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई व्हावी यासाठी प्रस्ताव पाठविला होता. गुन्हे शाखेतील पीसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद खोबरे यांनी प्रस्तावाची छानणी केली. त्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मतीन सैय्यद याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्याला 1 वर्षासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत तब्बल 58 सराईत गुन्हेगारांना स्थानबध्द केले
असून त्यांच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाया केलेल्या आहेत.
आगामी काळात देखील अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार असल्याचं
पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Raje Chhatrapati | संभाजीराजे छत्रपती देखील छगन भुजबळांवर भडकले! ‘राज्य सरकारला केला सवाल, अन्यथा मंत्री पदावरून…’

Prakash Ambedkar | भुजबळांनी जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल