Pune Police MPDA Action | उत्तमनगर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 84 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार निरज उर्फ गुण्या सुरज हिनोटिया (वय-20 रा. एन.डी.ए. पोलीस चौकी मागे, उत्तमनगर, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची (Pune Police MPDA Action) कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 84 वी कारवाई आहे.

आरोपी निरज उर्फ गुण्या हिनोटिया उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttamnagar Police Station) हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकू, कोयता यासारख्या धारदार हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायदा हत्यार बाळगून दहशत पसरवणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागिल दोन वर्षात त्याच्यावर 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीवितास व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपी निरज उर्फ गुण्या हिनोटिया याच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी निरज उर्फ गुण्या हिनोटिया याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारावाई उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : उधार देत नाही म्हणून दुकानाची तोडफोड, हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक