Pune Police News | पुणे पोलीस दलातील एपीआय राकेश कदम यांची जकार्ता येथे होणाऱ्या एशिएन शूटिंग चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघात निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील शुटिंग रेंज येथे महाराष्ट्र राज्य पोलीस शूटिंग (सर्व्हिस वेपन व स्पोटर्स वेपन) स्पर्धा 2023 चे (Maharashtra Police Shooting Competition) आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाती 15 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत पुणे शहर पोलीस (Pune Police News) दलातील 17 नेमबाजांनी एकूण 20 सुवर्ण, 12 रौप्य व 7 कांस्य पदकांची कमाई केली. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास (PCPC Police) सर्व्हिस वेपन, स्पोर्टस पुरुष व स्पोर्टस महिला या तिन्ही प्रकारात सगल दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवून दिले.

या स्पर्धेत पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman) -1 सुवर्ण, 1 रौप्य, सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम (API Rakesh Kadam) 2 सुवर्ण, 1 रौप्य, महिला सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस (API Aarti Khetmalis)- 1 कांस्य, पोलीस उपनिरीक्षक धिरज कांबळे 1 कांस्य, सहायक पोलीस फौजदार नितीन शिंदे 1 रौप्य, 1 कांस्य, सहायक पोलीस फौजदार सुनील पवार 1 रौप्य, 1 कांस्य, सहायक पोलीस फौजदार राजेंद्र पाटील 6 सुवर्ण,1 रौप्य, पोलीस हवालदार अमोल नेवसे 2 सुवर्ण, पोलीस हवालदार महेश जाधव 1 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य, महिला पोलीस हवालदार वैशाली गोडगे 1 सुवर्ण, 2 रौप्य, पोलीस नाईक दत्तात्रय खाडे 1 सुवर्ण, 1 रौप्य, पोलीस हवालदार सुहास धायगुडे आणि सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मोरे यांनी चमकदार कामगिरी करत पदके मिळवली. (Pune Police News)

एपीआय राजेंद्र पाटील यांनी सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पिस्टल शुटर व सर्वोत्कृष्ट एमपी 5
शुटरच्या किताबासह चषक प्राप्त केले. तसेच या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे एपीआय राकेश कमद यांची
जकार्ता (Jakarta) इंडोनेशिया (Indonesia) येथे जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या एशियन शुटिंग चॅम्पियनशीप
स्पर्धेकरीता (Asian Shooting Championship) 25 मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात भारतीय संघात (Indian Team)
निवड झाली आहे. त्यांच्यासह विजेत्या संघाचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना अभिनंदन केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त (अति. कार्य.) रामनाथ पोकळे
(IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया (IPS Arvind Chavriya),
पोलीस उपायुक्त (मुख्यालय) रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली
राखीव पोलीस निरीक्षक दशरथ हटकर, पोलीस उपनिरीक्षक मांढरे, टेंभूर्णे, साबळे, पोलीस हवालदार रोमाडे, हिंगे यांच्या सहकार्य़ाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पूर्ववैमनस्यातून येरवडा कारागृहात कैद्याचा खून, प्रचंड खळबळ

Bhima Koregaon Shaurya Din | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली सविस्तर माहिती

IPS Ritesh Kumar | पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात, मुंबई पेक्षा जास्त पुण्यात प्रतिबंधात्मक कारवाई – पोलीस आयुक्त रितेश कुमार (Video)

Pune PMC News | नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर केबलसाठी विनापरवाना ‘खोदाई’

Manoj Jarange Patil On CM Eknath Shinde | मनोज जरांगे यांची पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, ”आता आम्हाला त्यांच्यावर विश्वास…”