Pune Police News | CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांचा ‘ऑल आऊट’वर भर ! ‘कोम्बिंग’मध्ये 1727 गुन्हेगार ‘घेरले’; कोथरूडमध्ये 2 मोस्ट वॉन्टेड ‘हेरले’ (Video)

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Police News | पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी ऑल आऊट ऑपरेशनवर (Pune Police All Out Operation) भर दिला असून जुलै महिन्यात आतापर्यंत 3 वेळा संपुर्ण कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) राबविले. एवढेच नव्हे तर स्वतः आयुक्त आणि सह आयुक्त फिल्डवर येऊन पोलिसांना गाईड करत असताना दिसले. पुणे पोलिसांनी 3 कोम्बिंगमध्ये तब्बल 5 हजार 419 गुन्हेगारांची चेकिंग केली. त्यामध्ये पोलिसांनी तब्बल 1 हजार 727 गुन्हेगारांना घेरले. सीपी, ज्वाईंट सीपी, सर्व अप्पर पोलिस आयुक्त, सर्व पोलिस उपायुक्त तसेच सर्व सहाय्यक पोलिस आयुक्तांनी कोम्बिंग दरम्यान पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांना केलेल्या सुचनांचं फलित मंगळवारी पुणे पोलिसांना मिळालं.
कोम्बिंग ऑपरेशनमुळे ‘चार्ज’ झालेल्या पोलिस अंमलदारांनी कोथरूड परिसरात 2 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना हेरलं. अति वरिष्ठांनी सखोल चौकशीनंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. पण याची सुरूवात पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी राबविण्यास सुरूवात केलेल्या ऑल आऊट ऑपरेशनपासुन झालेली आहे. (Pune Police News)

 

 

 

पुणे पोलिसांनी (Pune Police News) मंगळवारी पहाटे दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले दोघेजण मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) असल्याची माहिती समोर आली. या दोघांवर एनआयएकडून (NIA) 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मागील दीड वर्षापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांना पकडण्यात यश येत नव्हते. अखेर पुणे पोलिसांनी त्या दोघांना कोथरुड भागातून बेड्या (Pune Crime News) ठोकल्या आहे. या कारवाईत खरे हिरो ठरले ते कोथरुड पोलीस ठाण्यातील (Kothrud Police Station) पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण (Pradeep Chavan), अमोल शरद नझन (Amol Sharad Nazan) आणि लष्करातून निवृत्त झाल्यानंतर पोलिस दलात रूजू झालेले पोलिस अंमलदार मंगेश शेळके (Mangesh Shelke).

शहरातील काही भागात कोयता गँग (Koyta Gang) आणि वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) करण्याच्या घटना
घडल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) करुन गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जात आहेत.
मंगळवारी पहाटे कोथरुड पोलीस ठाण्यातील कर्मचारी गस्त घालत असताना कोथरुडच्या बधाई चौकात दुचाकी चोरी करताना तीन तरुण
दिसून आले. (Pune Crime News)

त्यावेळी कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन यांनी त्या तीघांना पकडले.
मात्र, एकजण तेथून पळून गेला.
प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन यांनी दोघांना पकडून ठेवले आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन आले.
मोहमद युनूस साकी (Mohammad Yunus Saki) व इम्रान खान (Imran Khan) असे पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे मोबाईल आणि लॅपटॉप आढळून आले. त्याची उकल पोलिस अंमलदार मंगेश शेळके यांनी केली.
त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी खरी माहिती पोलिसांना दिली.
त्यांच्या माहितीत हे दोघेजण राजस्थानातील (Rajasthan) मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार (Most Wanted Criminals) असल्याचे समोर आले.
याबाबत पुणे पोलिसांनी एनआयए तसेच इतर तापस यंत्रणांना याची माहिती दिली. त्यांच्याकडून पुढील चौकशी सुरु असून

पुणे पोलिसांनी पकडलेले हे दोन दहशतवादी इसिसच्या (ISIS) सुफा संघटनेचे सदस्य (Sufa Organization Member) असल्याचा
संशय आहे. मार्च 2022 मध्ये राजस्थामधील छितोडगड येथे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते आणि त्यांच्याकडून बॉम्ब
बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. त्यावेळी तिघांकडून बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी पावडर व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले होते.

यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी एनआयेकडे देण्यात आले.
एनआयएने केलेल्या तपासात युनूस साकी आणि इम्रान खान या दोघांची नावे समोर आली.
याच प्रकरणात हे दोघे एनआयए च्या मोस्ट वॉन्टेड आरोपींच्या यादीत होते. या दोघांवर प्रत्येकी 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात
आले होते. आरोपी मागील काही दिवसांपासून कोंढवा परिसरात राहत होते. ते कोथरूडमध्ये सतत ये-जा करायचे.

पुणे पोलीस दलातील पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण, अमोल नझन, मंगेश शेळके यांनी केली.
यांनी मोठी कामगिरी करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.
मात्र दुसरीकडे पुण्यात हे दहशतवादी कशासाठी आले होते.
त्यांचा हेतू काय होता त्यांचा तिसरा साथीदार कुठे फरार झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, पुण्यात दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिसांचे कौतुक केले असून सर्वांना बक्षिस मिळणार असून या टीमध्ये एकुण
10 पोलिस सहभागी होते असे सांगितले आहे. कोथरूडमधील पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात
घेवून तात्काळ कारवाई केली असल्याचे ते म्हणाले.

Web Title :   Pune Police News | CP Ritesh Kumar, Jt CP Sandeep Karnik emphasis on ‘all out’! 1727 criminals ’rounded up’ in ‘combing’; 2 Most Wanted arrested in Kothrud (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा