Pune Police News | गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना भोजन व अल्पोपहार ! वरिष्ठ अधिकार्‍यांसह 6 हजार अधिकारी-कर्मचारी, होमगार्ड, पोलीस मित्रांनी घेतला आस्वाद

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Police News | पुणे शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांनी सादर केलेले देखावे, विद्युत रोषणाई पाहण्यासाठी लाखो लोक येत असतात. पुण्यातील गणेशोत्सव निर्विघ्न व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा (Pune Police News) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येतो. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना भोजन व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. या सुविधेचा एकूण 6 हजार पोलीस, होमगार्ड, पोलीस मित्र यांनी आस्वाद घेतला असल्याची माहिती दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे (The Poona District Police Co-op. Credit Society) अध्यक्ष प्रशांत शिंदे (Police Prashant Shinde) यांनी दिली.

प्रशांत शिंदे म्हणाले, गणपती विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी साधारणपणे 48 तास पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांना बंदोबस्त करावा लागतो. बंदोबस्तावर असताना त्यांना जागेवरुन हलता येत नाही. त्यामुळे संस्थेच्या वतीने अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था पुणे शहरातील प्रमुख सहा ठिकाणी करण्यात आली होती. 19 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत पोलीस अंमलदार व अधिकारी यांच्या भोजनाची व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. (The Poona District Police Co-op. Credit Society)

पोलिसाची नोकरी करत असताना दिवस-रात्र रस्त्यावर उभे रहावे लागते. सणासुदीच्या काळात देखील पोलिसांना त्यांच्या कुटुंबासमवेत राहता येत नाही. या काळात त्यांचे अनेकदा जेवणाचे हाल होतात. दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीने पोलिसांची हीच गरज ओळखून गणपती विसर्जन काळात चार हजार पोलिसांना जेवण दिले आहे.

याशिवाय पालखी काळात आळंदी ते पंढरपूर पर्यंत पोलिसांसाठी नाष्ट्याची सुविधा पोलिसांना पुरवली जाते.
या संस्थेकडून पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात, असेही प्रशांत शिंदे यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik)
यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटी राबवित
असलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every updateहे देखील वाचा

Sujata Phadnis Passes Away | दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांना मातृशोक, सुजाता फडणीस यांचे निधन