Pune Police News | पुण्यात इसिसचे दहशतवादी पकडले, एनआयएच्या प्रमुखांकडून पुणे पोलिसांचे कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | देशभरात दहशतवादी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या इसिसच्या दोन दहशतवाद्यांना (Pune ISIS Case) पुणे पोलिसांनी कोथरुड परिसरातून दुचाकी चोरताना अटक केली. अटक करण्यात आलेले दहशतवादी वर्षभर फरार होते. त्यांच्यावर एनआयएकडून (NIA) 10 लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दोघा दहशतवाद्यांना पकडून देशभरातील दहशतवाद्यांच्या कारवाया व स्लीपर सेलची कडी उकलण्यास मदत केल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेने (National Investigation Agency) पुणे पोलिसांच्या (Pune Police News) कामगिरीचे पत्र पाठवून कौतुक केले आहे. एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता (NIA DG Dinkar Gupta) यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) आणि पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma) यांना पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. (Pune Police News)

कोथरुड परिसरात दुचाकी चोरताना कोथरुड पोलिसांनी तिघांना पकडले होते. त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी कोंढव्यात गेले असताना त्याच्यातील मोहमेमद शाहनवाज आलम (Mohammed Shahnawaz Alam) हा पळून गेला होता. युसूफ खान आणि मोहम्मद युनूस साकी या दोघांकडे केलेल्या चौकशीत ते एनआयएने त्यांना फरार घोषीत केल्याचे व त्यांच्यावर दहा लाख रुपये बक्षीस जाहीर केल्याचे निष्पन्न झाले होते.

यानंतर एनआयए ने या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात पुण्यासह महाराष्ट्र व देशातील विविध शहरात
असलेल्या इसिसच्या स्लिपर सेलचा माग काढणे एनआयएला शक्य झाले. यातूनच पुण्यातील डॉ. अदनान सरकार
(Dr. Adnan Sarkar) व त्याच्या नातेवाईकांपर्यंत एनआयएला पोहचता आले.
पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यामुळे त्यांची पाळेमुळे खणून काढण्यात एनआयएला मोठी मदत मिळाली आहे. दहशतवाद्यांच्या देशभरातील संभाव्य कारवाया रोखण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सध्या कसे कार्यरत आहेत, त्यांचे ब्रेनवॉशिंग कसे केले जात आहे, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरील माहिती एनआयएला मिळणे शक्य झाले.

पुणे पोलिसांच्या (Pune Police News) या कामगिरीमुळे हे शक्य झाल्याचे एनआयएचे पोलिस महासंचालक दिनकर
गुप्ता यांनी पत्रात उल्लेख करुन खास कौतुक केले आहे. पुणे पोलिसांच्या प्रशंसनीय कामामुळे देशातील दहशतवादी
कारवाया व गुन्हे रोखणे शक्य झाले असल्याचे म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | बागेश्वर धाम बाबांचे मराठा आरक्षणावर भाष्य, ”देश संकटात असताना मराठ्यांनी शौर्य दाखवलं, त्यांना…”

Pune Crime News | महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, वाघोली परिसरातील घटना