Pune Crime News | महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, वाघोली परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वाघोलीत अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. अजय विश्वनाथ पवळे Ajay Vishwanath Pavle (वय-16 रा. अनुसया पार्क, वाघोली) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अजय याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकले नाही. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Pune Crime News)

अजय पवळे हा वाघोली येथील अनुसया पार्कमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो एका महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकत होता. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना अजयने गळफास घेऊन आत्महत्या केली. अजयची आई सायंकाळी कामावरुन घरी परत आल्यानंतर अंजयने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. (Pune Crime News)

याबाबत लोणीकंद पोलिसांना (Pune Police) माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अजयने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर पवळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. लोणीकंद पोलीस तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

डेटिंग अ‍ॅपवरुन तरुणांना लुटणाऱ्या ‘बंटी-बबली’ला गुन्हे शाखेकडून अटक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

वारजे माळवाडी पोलिसांकडून विद्यार्थ्यांच्या लॅपटॉप चोरीचे 12 गुन्हे उघडकीस ! पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लॅपटॉप केले परत

महापालिकेचा राज्य विद्युत मंडळाला अखेर ‘शॉक’; वीज वाहीन्यांसाठीचे खोदाई शुल्क वाढविण्यात येणार

पुणे हादरले! घरी सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक

डेंग्यूच्या साथीचा पावसाळ्याचा ‘पिक पिरियड’ संपल्यानंतर महापालिकेची औषध फवारणीची निविदा प्रक्रिया