Pune Police News | आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मुंढवा पोलिसांनी वाचवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | मुंढवा येथील सर्वोदय कॉलनीतील (Sarvodaya Colony Mundhwa) इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्येच्या तयारीत (Attempted suicide) असलेल्या तरुणाला मुंढवा पोलीस ठाण्याच्या टीमने (Mundhwa Police Station) घटनास्थळी जात जीवाची बाजी लावून वाचविले. वडिलांना दारुचे व्यसन असल्याने सतत होणाऱ्या घरगुती वादामुळे आणि काम मिळत नसल्याने नैराश्यातून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. मुंढवा पोलिसांनी (Pune Police News) दाखवलेल्या चपळाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एक तरुण सर्वोदय कॉलनी मुंढवा येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत असून, त्याला अनेक नागरिक रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र तो कोणाचेही ऐकत नाही. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ मदत पाहिजे, असा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला (Police Control Room) आला. त्यानंतर मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीट मार्शल (Beat Marshal) पोलीस अंमलदार महेश पाठक, पोलीस हवालदार मेमाणे यांना नियंत्रण कक्षाकडून याबाबतचा कॉल प्राप्त झाला. त्यानंतर बिट मार्शल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, नियंत्रण कक्षातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior PI Vishnu Tamhane) यांना देखील याबाबत व्हॉटसअॅप द्वारे माहिती देण्यात आली. (Pune Police News)

विष्णू ताम्हाणे यांनी दिवसपाळी कर्तव्यावर असणारे सहायक पोलीस निरीक्षक महानोर (API Mahanor) यांना सूचना देऊन घटनास्थळी रवाना केले. महानोर आणि त्यांचे पथक गणपती मंदिराच्या मागील सर्वोदय कॉलनी येथे पोहोचले. त्याठिकाणी प्रणित नरेंद्र जाधव Praneet Narendra Jadhav (वय-18) हा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरुन उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी देत होता. तर त्याची आई पद्मा जाधव या त्याला समजावून सांगत होत्या. तसेच नागरिकांना मदतीचे आवाहन करत होत्या.

पोलिसांनी प्रणित याला बोलण्यात गुंतवून ठेऊन त्याला आत्महत्या करण्याचे कारण विचारले. त्याने सांगितले वडीलांना दारुचे व्यसन असल्याने कौटुंबीक वाद होतात. तसेच कमी शिकल्याने मला काहीही काम मिळत नाही. म्हणून मला जिव नकोसा झाल्याने मी आत्महत्या करत आहेत. दरम्यान, पोलीस पथकातील काही जण इमारतीच्या टेरेसवर गेले. पोलिसांची चाहूल लागताच प्रणित याने दुसऱ्या बिल्डींगच्या टेरेसवर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महानोर व त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी त्याला चपळाईने ताब्यात घेतले. त्यानंतर उपस्थित नागरिकांचा व प्रतिकच्या आईचा जीव भांड्यात पडला. नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करुन आभार मानले.

प्रणीत जाधव याला मुंढवा पोलीस ठाण्यात आणून त्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे
यांनी त्याचे समुपदेशन केले.
तसेच त्याच्या वडिलांना बोलावून व्यसन न करण्याबाबत समजावून सांगितले.
याशिवाय प्रणीत याला लवकरच चांगल्या ठिकाणी कामाला लावण्याचे आश्वास त्याच्या
आईला देऊन कुटुंबाला मानसिक आधार दिला.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक महानोर, पोलीस हवालदार मेमाणे, पाठक, भांदुर्गे, कोकरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Financial Rules Changing | 1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ महत्वाचे नियम,
थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम