Pune Police News | पुण्यात भररस्त्यात पोलिसानं सहकाऱ्याला केली मारहाण; वरिष्ठांकडून तडकाफडकी निलंबनाची कारवाई

पुणे न्युज (Pune Police News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – शहर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास भररस्त्यात कर्तव्यावर असतानाही मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भररस्त्यात घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये हाणामारीची खमंग चर्चा रंगली. तत्पूर्वी संबंधित कर्मचाऱ्यास वरिष्ठांनी पोलीस खात्यातून निलंबित केले आहे.

विजयकुमार सुभाष पाटणे असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

विजयकुमार हे पोलीस शिपाई आहेत. त्यांची कोथरुड पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. दरम्यान, त्यांची 10 मे रोजी त्यांना मास्क कारवाईसाठी नेमणूक होती. तर त्यांचे सहकारी पोलीस शिपाई श्रवण शेवाळे हे देखील कोथरुड पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. शेवाळे यांची त्याच दिवशी म्हणजे 10 मे रोजी त्यांची नाकाबंदीसाठी नेमणूक करण्यात आली होती.

रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ते पौड रोडवर कर्तव्य बजावत होते. या दरम्यान विजयकुमार हे त्यांचे मास्क कारवाईचे कर्तव्य सोडून पौड रोडवर गेले. यावेळी श्रवण यांना फोन आल्याने ते फोनवर बोलत बोलत नाकाबंदी घटनास्थळापासून काही अंतर फोनवर बोलत पायी चालत होते. यावेळी दुचाकीवर पाठीमागून त्यांच्याजवळ विजयकुमार गेले आणि त्यांना तू मला धक्का का दिला असे म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यांना मारहाण केली. डोक्यात आणि छातीवर बुक्यांचा मारा केला. रस्त्यावरच हा प्रकार
घडल्याने यामुळे गोंधळ उडाला. यावेळी श्रवण यांच्याबरोबर कर्तव्यावर असलेले त्यांचे सहकारी
पोलीस कर्मचारी रमेश चौधरी यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी विजयकुमार यांना आवरण्याचा प्रयत्न
केला. मात्र, त्यांना देखील या घटनेत हाताच्या करंगळीला मार लागला.

यानंतर हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले. यावेळी या घटनेची स्टेशन डायरी नोंद करण्यात
आली. याबाबत वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडून घटनेचा अहवाल मागवला. यात श्रवण यांनी
काहीही एक न बोलता त्यांना मारहाण झाल्याचे समोर आले. तसेच या घटनेमुळे पोलीस खात्याची
जनमानसात प्रतिमा मलीन झाली असल्याचा ठपका ठेवत विजयकुमार यांना पोलीस खात्यातून
निलंबित करण्यात आले आहे. परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी
निलंबनाचे आदेश दिले आहेत.

 ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Police News | policeman suspended of kothrud police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update