Pune Police News | धक्कादायक! पुण्यात पोलीस पतीला सुट्टी न मिळाल्याने पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पतीला सुट्टी न मिळाल्याने पोलिसाच्या पत्नीने (Police Wife) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Attempt) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचे पती पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेत (Traffic Branch) नियोजन विभागाच्या पोलीस निरीक्षकांच्या (PI) वाहनावर चालक (Driver) म्हणून कार्यरत आहेत. पतीला सुट्टी मिळाली नसल्याने दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. जखमी झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पुणे पोलीस दलात (Pune Police News) खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे पती वाहतूक शाखेत नेमणूकीस आहे. तर त्या स्वत: येरवडा कारागृहात (Yerawada Jail) पोलीस (Pune Police News) आहेत. वाहतूक शाखेच्या नियोजन विभागाच्या पोलीस निरीक्षकांच्या वाहनावर चलक असलेल्या कर्मचाऱ्याला किरकोळ सुट्टी हवी होती. मात्र, ती मिळत नव्हती. यातच त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्ट्या देखील काही कारणास्तव रद्द करण्यात आल्या होत्या.

पोलीस कर्मचाऱ्याची रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. दोघांनी काल खरेदी व चित्रपट पाहिला. आज (सोमवार) त्यांच्यामध्ये सुट्टी घेण्यावरुन वाद झाला. पत्नी त्यांना सुट्टी घेण्यास सांगत होती, मात्र पतीने सुट्टी नसल्याचे सांगितले. यावरून दोघांत वाद झाला. पतीने सुट्टी मिळावी, यासाठी अर्ज केला होता. परंतु वरिष्ठांशी याबाबत बोलणे झाले नव्हते. शनिवारी निरीक्षकांना घरी सोडण्यास गेल्यानंतर कर्मचाऱ्याने सुट्टी बाबत विचारणा केली होती. मात्र वरिष्ठांनी काहीच उत्तर दिले नाही.

काल साप्ताहिक सुट्टी घेतल्यानंतर आजच्या सुट्टीबाबत त्यांनी वरिष्ठांना फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांनी सुट्टी नसल्याचे पत्नीला सांगितले. तुम्हालाच कशा सुट्ट्या मिळत नाहीत, असे म्हणून त्यांत वाद झाला. पती काहीच न बोलता आंघोळीला निघून गेले. त्यानंतर पत्नी रागात खोलीत निघून गेली. पतीला संशय आल्याने त्यांनी बाथरुममधून बाहेर आले. त्यावेळी त्यांचे वडील देखील घरात होते. दोघांनी खोलीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पत्नी गळफास (Hanging) लावून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. त्या दोघांनी जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच कोथरुड वाहतूक विभाग, कोथरुड पोलीस ठाण्याच्या (Kothrud Police Station) अधिकारी
व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली.
पतीला सुट्टी मिळत नसल्याच्या कारणावरुन पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने पुणे पोलीस दलात प्रचंड
खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित कर्मचारी नऊ ऑगस्ट रोजी
वाहतूक विभागात आले आहेत. त्यांना नियोजन विभागाच्या पोलीस निरीक्षकंच्या वाहनावर ड्युटी देण्यात आली आहे.
त्यातच त्यांनी दोन दिवसांची रजा घेतली आहे. वाहन चालकांना सुट्टी न देण्याचा प्रश्नच येत नाही, आपण सुट्ट्या देत असतो.
त्या दोघांमध्ये वादावादी झाली असावी, मात्र सुट्टी न दिल्याचे कारण समोर केले असावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil On Katraj Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा ! वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने 125 वॉर्डनची नियुक्ती करा!