Pune Police News | गणेश मंडळांचे देखावे पाहताना मोबाईल सांभाळा, पुणे शहरात सहा दिवसांत मोबाईल चोरीला गेल्याच्या हजार तक्रारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | मोबाइल फोन हा सध्याच्या जगात अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल फोनशिवाय एक दिवसही काढणे आजच्या काळात शक्य नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये मोबाइल पाहायला मिळतो. दिसायला जरी लहान असला तरी एवढ्याश्या मोबाईल मध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे. त्यामुळे मोबाईलचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. हाच मोबाईल चोरीला (Mobile Thief) गेला तर? पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाउंड’ (Lost and Found) या ऑनलाइन पोर्टलवर गणेशोत्सवादरम्यान Pune Ganeshotsav 2023 (19 ते 24 सप्टेंबर) तब्बल 927 मोबाईल चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police News) दिली.

पुण्यामध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. गणेश मंडळांनी तयार केलेले देखावे,
रोषणाई पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात येत आहेत. यामुळे पुण्यात गर्दी होत आहे.
याचाच फायदा घेऊन मोबाईल चोर लोकांच्या मोबाईलची चोरी करतात.
सर्वाधिक मोबाईलची चोरी विसर्जन मिरवणुकीमध्ये होते. त्यात बेलबाग चौक ते मंडई या परिसरात ज्यावेळी महत्त्वाचे गणपती मिरवणुकीत सहभागी होतात त्यावेळी या घटना जास्त प्रमाणात घडतात. त्यामुळे देखावे पाहताना किंवा विसर्जन मिरवणुकीत आपला मोबाईल सांभाळा, असे आवाहन पुणे पोलिसांनी (Pune Police News) केले आहे.

सहा दिवसात 927 तक्रारी

गणेशोत्सव सुरु होऊन सहा दिवस झाले आहेत. या कालावधीत पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँन्ड फाउंड’वर 927 तक्रारी
आल्या असून, फक्त 25 मोबाईल रिकव्हर झाले आहेत. गेल्या आठ महिन्यात तब्बल 25 हजार 557 मोबाइल
चोरीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी केवळ 761 मोबाईल रिकव्हर करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.

चोरीची तक्रार कुठे करायची?

मबाईल चोरीला गेला तर https://admin.punepolice.gov.in/LostFoundRegया पोर्टलवर जा.
याठिकाणी दिलेला सर्व तपशील व्यवस्थित भरा. त्यानंतर कॅप्चा टाकून ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
तुम्ही मोबाइल चोरीची तक्रार नॅशनल वेबसाइट https://ceir.gov.in यावरही तक्रार करू शकता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंची ‘त्या’ मुद्यावरुन व्यापाऱ्यांना इशारा, म्हणाले-‘ नसत्या भानगडीत पडू नका, मनसैनिकांचे लक्ष असेल हे विसरु नका’