Pune Police News | पोलिसांमधील उत्साह व मनोबल वाढविण्यासाठी झोन-2 मध्ये कार्यशाळा ! 16 पोलिस अधिकार्‍यांसह 122 पोलिस अंमलदारांचा सहभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News |  झोन 2 च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांच्या संकल्पनेतून झोन-2 मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन (Pune Police Workshop) करण्यात आले. पोलिसांमध्ये (Pune Police News) उत्साह निर्माण करुन मनोबल निर्माण करणे हा प्रमुख उद्देश होता. या कार्यशाळेत झोन -2 विभागातील 16 पोलीस अधिकारी व 122 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.

पोलिसांसाठी (Pune Police News) आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत राजेंद्र भिडे (Rajendra Bhide) यांनी ‘संवाद कौशल्य’, सीमा देसाई-नायर (Seema Desai-Nair) यांनी ‘मनाची भाषा’ व ‘न्युरोल्यूजेस्टीक’ चे दैनंदिन जीवनातील फायदे, स्वारगेट विभागाचे (Swargate Division) सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांनी ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करुन त्यांच्यामध्ये तणावमुक्ती करुन, दैनंदीन जीवनात उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी उपस्थित अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या अडचणी व सुचना ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, मनोबल वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या संकल्पनेतून सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर,
स्वारगेट पोलीस स्टेशनचे (Swargate Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे (Senior PI Sunil Zawre),
पोलीस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव (PI Somnath Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक संदे, काकरे, अश्विनी बावचे, पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील,
किर्ती चाटे, येवले, यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेऊन सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police | महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! 62 वर्षापूर्वीच्या नियमात बदल; पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वाढणार