Pune : लॉकडाऊनमध्ये 145 लिटर ताडी जप्त, चौघांवर FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – संचारबंदीत विदेशीपेक्षा देशी अन हातभट्टी दारू तेजीत सुरू असल्याचे दिसत असून, गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने चतुशृंगी आणि विमानतळ परिसरात छापे मारीकरून हे तळ उध्वस्त केले आहेत. येथून 146 लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी जया सिल्व्हर गुंजाळ, दिपाली शक्ती परदेशी, सुशील सरजू भाट आणि नितु अशोक पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात संचारबंदी लागू आहे. त्यात पूर्ण शहरात उद्यापरियंत कर्फ्यु लावण्यात आला आहे. अत्यावश्यक वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. मात्र यकालावधीत अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीने आणि अवैधरित्या दारू विकली जात आहे. गुन्हे शाखेच्या पथकांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान चतु: श्रुंगी परिसरात वडारवाडी येथे ताडीची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंझाड, पथकातील सुनील पवार, सुरेंद्र साबळे, राकेश खुनवे, विशाल शिर्के, गणेश साळुंखे यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यासोबतच विमानतळ परिसरात कलवड वस्तीवर छापा टाकून ६० लीटर ताडी जप्त केली.

दत्तवाडीत गावठी दारूची विक्री करणाऱ्यास पकडले. त्याच्याकडून २४ लीटर दारू जप्त करण्यात आली आहे. सागर परमेश्वर डोलारे (वय ३२, रा.आंबील ओढा वसाहत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलिस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, शिवाजी क्षरसागर,राहुल ओलेकर, सोमनाथ यादव यांच्या पथकाने केली.