Pune : पोलिसांची शासकीय गाडी मद्यपी चालकाच्या हाती, शिक्रापूर-चाकण चौकातील खळबळजनक प्रकार

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात येत आहे. शिरुर – चाकण चौकात ऑक्सिजन वाहनाला संरक्षण देणाऱ्या पोलीस वाहनावरील पोलीस कर्मचारी मद्यधुंद असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. मद्यपी वाहन चालकाच्या ताब्यात शासकीय वाहन दिलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

डोळ्यांच्या समस्येपासून ‘कब्ज’मध्ये देखील फायदेशीर ठरतात हिरवे धणे, जाणून घ्या 5 चमत्कारी फायदे

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या 

शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील चाकण चौकात रविवारी (दि.30 मे) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस विभागातील शासकीय वाहन (एमएच 12 टीएच 2892) एका तासापेक्षा जास्त वेळ चाकण शिक्रापूर रस्त्यावर रस्त्याचे मधोमध उभे असल्याचे नागरिकांना दिसून आले. त्या वाहनातील चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे नागरिकांना दिसून आल्यानंतर नागरिकांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.

रात्री साडेनऊच्या सुमारास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हावलदार शंकर साळुंके, पोलीस नाईक हरीश शितोळे, ब्रह्मा पोवार, विजय देशमुख यांनी या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी शासकीय वाहनामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शासकीय गणवेशात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला वाहनातून बाहेर घेतले. पोलिसांनी शासकीय वाहन व पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले.

नागरिकांचे वाहन रस्त्यावर उभे असताना व वाहन चालक मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. आता पोलिसांच्या शासकीय वाहनावर तैनात असलेला पोलीस कर्मचारीच मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना आढळून आला आहे. त्यामुळे पोलीस या मद्यपी पोलीस कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष्य लागले आहे.

यासंदर्भात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन अतकरे यांच्याशी संपर्क साधला असता, सदर पोलीस कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल पोलीस स्टेशन येथे सादर केला असून वरिष्ठ अधिकारी पुढील कार्यवाही करतील, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांनी सांगितले.

READ ALSO THIS :

12 वी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, केंद्रीय शिक्षणमंत्री AIIMS मध्ये दाखल

कोरोनावर चमत्कारी औषधाचा दावा करणाऱ्या माजी मुख्याध्यापकाचा कोरोनानेच मृत्यू

Supriya Sule : शरद पवारांनी दिलेला दिल्लीबाबतचा ‘तो’ सल्ला कायम लक्षात ठेवते

Property Tax : पुणेकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा ! मिळकत कर योजनेची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढवली; आतापर्यंत 736 कोटींचे विक्रमी उत्पन्न