Pune : पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि त्याच्या भावाकडून Covid केअर सेंटरमधील डॉक्टरला चौकीत घुसून मारहाण, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने व त्याच्या भावाने कोव्हीड सेंटरमधील एका डॉक्टरला मारहाण(Beat) केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस चौकीत तक्रार देण्यास गेल्यानंतर चौकीत शिरून त्यांना मारहाण(Beat) केली आहे. गुन्हे शाखेत कर्मचाऱ्याची नेमणूक असून, फोन उचलत नसल्याने मारहाण(Beat) झाल्याचे सांगितले जाते.

घरगुती LPG गॅस सिलेंडर आज ‘स्वस्त’ झाला की ‘महाग’; जाणून घ्या 1 जूनचे दर

याप्रकरणी डॉ. अजयश्री अधिकराव मस्कर (वय 25) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस कर्मचारी सचिन सिद्धेश्वर गायकवाड (वय 40) आणि त्याचा भाऊ सागर सिद्धेश्वर गायकवाड यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन गायकवाड हे पोलीस नाईक आहेत. त्यांची नेमणूक गुन्हे शाखेच्या युनिट तीनमध्ये आहे. दरम्यान, बाणेरला डेडिकेटेड Covid केअर सेंटर आहे. याठिकाणी फिर्यादी डॉ. अजयश्री काम करतात. सोमवारी दुपारी ते Covid सेंटरच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी कार्यालयात एकजण आला. त्याने येथे दाखल असणाऱ्या रुग्णाचा मी भाचा असे सांगितले. यानंतर “तुम्ही आमचे फोन का उचलत नाही” असे म्हणत फिर्यादी डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. तर त्यांच्या अंगावर धावून जात मारण्याचा प्रयत्न केला.

नव्या महिन्याची सुरुवात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने; जाणून घ्या आज काय आहेत इंधनाचे दर

याप्रकरणानंतर डॉ. अजयश्री हे पालिकेचे डॉ. अतुल तांबडे व इतर स्टाफ आणि महापालिकेच्या सिक्युरिटी गार्ड प्रमुख हे सोबत बाणेर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना झालेल्या प्रकाराची माहिती देत असताना पुन्हा सागर गायकवाड आणि सचिन गायकवाड यांनी चौकीत प्रवेश केला आणि त्यांना पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारे सिक्युरिटी ऑफिसर अजित गजमल यांना देखील दोन्ही आरोपींनी मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांकडे दाखल फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास चतु:शृंगी पोलिस करत असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

मुंबईतील दुकाने सम-विषम फार्म्युल्याने दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार, महापालिकेकडून वेळापत्रक जारी

Black Fungus : कोरोनातून रिकव्हरीनंतर सुद्धा होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

तृतीयपंथीनेच केला तृतीयपंथीवर लैगिक अत्याचार; दोन गटातील वादातून मारहाण करुन लुटले

नारायण राणेंची मराठा समाजासाठी मागणी, म्हणाले – ‘3 हजार कोटींचे पॅकेज द्या’