Pune Purandar Crime News | पुरदंरमध्ये अफुची शेती करण्याचा दुसरा प्रकार उघड ! ७६ हजारांची ३८ किलो अफुची बोंडे जप्त, कांदा, लसुणामध्ये केली शेती, दोघांना अटक

पुणे : Pune Purandar Crime News | पुणे पोलिसांनी (Pune Police) कुरकुंभ येथील (MIDC Kurkumbh) एम डी हा अंमली पदार्थ (MD Drugs) बनविणारा कारखाना उघडकीस आणला. तेथून देशापरदेशात एमडी पुरविले जात असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतामध्ये (Pune Rural Police) अफुची लागवड (Opium) केली जात असल्याचा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

किरण कुंडलीक जगताप Kiran Kundlik Jagtap (वय ४०) व रोहिदास चांगदेव जगताप Rohidas Changdev Jagtap (वय ५५, रा. कोडीत, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख (Pune SP Pankaj Deshmukh) यांनी ग्रामीण पोलिस दलाचा कार्यभर स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री सेवन करणार्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. जेजुरी पोलिस ठाण्याच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मावडी मध्ये शेतात विनापरवाना अफुची लागवड करुन उत्पादन घेतले जाते अशी बातमी मिळाली. त्यानुसार जेजुरी (Jejuri Police) व भोर पोलीस ठाण्यातील (Bhor Police Station) पोलिस अधिकारी मावडी गावातील जगताप मळ्यातील कवठीचा मळा येथे गेले. तेथील दोन वेगवेगळ्या शेतात जावून पाहणी केली असता तेथे बेकायदेशीर विनापरवाना अफुची लागवड केलेली दिसून येऊ नये, म्हणून कांदा व लसुण पिकाची लागवड करण्यात आली होती. ७६ हजार ५६० रुपयांचे ३८.२८ किलो वजनाची अफुची झाडे जप्त करण्यात आली आहे.

पाच दिवसांपूर्वी पुरंदर तालुक्यातील कोडीत गावात स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना अफुची लागवड केलेल्या दोघांवर कारवाई केली होती.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव (Addl SP Sanjay Jadhav), उपविभागीय अधिकारी श्रीकांत पांडुळे (SDPO Shreekant Pandule) यांच्या मार्गदर्शनाखाली भाेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब पवार (PI Annasaheb Pawar), जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे (API Deepak Wakchaure), पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील (PSI Mahesh Patil), नामदेव तारडे (PSI Namdev Tarde), पोलिस अंमलदार विठ्ठल कदम, शुभम भोसले, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, भानुदास सरक यांनही ही कामगिरी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

महिलेला जीवे मारण्याची धमकी देणार्‍यास अटक; अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल