Pune Railway Station | पुणे स्टेशनवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ उपक्रमास सुरुवात; आता मिळणार 24 तास हॉटेलची सुविधा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वे सेवा वापरणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता रेल्वे प्रशासन नवनवीन सुविधा उपलब्ध करुन देत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची भूक भागावी याकरिता ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ (Restaurant on Wheel) हा उपक्रम राबवला जात आहे. आता पुणे रेल्वे स्टेशनवरही (Pune Railway Station) हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली असून या उपक्रमांतर्गत प्रवाशांना 24 तास खानपानाची सुविधा उपलब्ध राहावी असा हेतू आहे. यामध्ये एका रेल्वे डब्ब्यांमध्ये हॉटेलची सुविधा देण्यात येणार आहे. आता पुणे रेल्वे स्थानकावरही (Pune Railway Station) ही सुविधा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ या संकल्पनेंतर्गत पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway Station) मागील पार्किंगमध्ये एक रेल्वे डब्बा उभारण्यात आला आहे.
या डब्ब्यामध्ये हॉटेल (Hotel At Pune Station) सुरु करण्यात आले आहे.
यापूर्वी पिंपरी चिंचवड रेल्वे स्थानकावर (PCMC Railway Station) अशी सुविधा सुरु करण्यात आली होती आता
रेल्वे प्रशासनातर्फे पुणे रेल्वे स्थानकावर ही सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेचा ठेका रेल्वे प्रशासनाने मेसर्स ओम इंडस्ट्रीजला (M/s Om Industries) दिला आहे. मागील प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात येणाऱ्या रेस्टॉरंट ऑन व्हील साठी रेल्वेने ट्रैक, ड्रेनेज आणि आयुर्मान संपलेला डबा ठेकेदाराला दिला आहे. त्याची सजावट ठेकेदाराकडून करण्यात येणार आहे. ठेकेदार रेल्वेला पाच वर्षांचा 3 कोटी 18 लाख रुपयांचा महसूल देणार आहे. रेल्वेचा आणि ठेकेदाराचा 5 वर्षांचा करार झाला आहे. रेल्वेचे आगामी काळात ‘रेस्टॉरंट अ‍ॅड व्हील’चे नियोजन पुणे विभागातील आकुर्डी (Akurdi), बारामती (Baramati), मिरज (Miraj) या ठिकाणी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Police News | पोलीस उपायुक्त (DCP) व सहायक पोलीस आयुक्त (ACP) यांची तडकाफडकी बदली