पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rains | पुणे शहरासह उपनगरात शुक्रवारी (दि.10) सायंकाळी पाचच्या सुमारास सर्व भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने ठिकठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळालं. राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे दिवाळीची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. (Pune Rains)
मान्सूनने निरोप घेऊन महिनाभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यानंतर ऑक्टोबर हिटचा तडाखाही पुणेकरांनी अनुभवला असताना हवामानातील अचानक बदलामुळे शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान पुण्यात पावसाच्या सरी कोसळल्या. बिबवेवाडी, कोथरुड, धायरी भागासह शहराच्या मध्यवर्ती भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. ऐन दिवाळीत पुण्यात पाऊस पडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Pune Rains)
शुक्रवारी सायंकाळी पुण्यात पडलेल्या पावसामुळे वाहनधारकांनी साचलेल्या पाण्यातून वाट काढली.
गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. दरम्यान, थंड हवेचे ठिकाण
म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील 48 तासांत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
पुण्यामध्ये नवरात्रीपासून थंडीची चाहूल लागते. आणि दिवाळी सपता संपता बऱ्यापैकी गुलाबी थंडीचा मौसम सुरु होत असतो.
मात्र यंदा विपरीतच घडत असून ऐन दिवाळीच्या दिवसांत पावसाच्या सरी कोसळत असल्याने आता थंडीसाठी स्वेटर
घ्यावा की पावसासाठी रेनकोट किंवा छत्री घ्यावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा