Devendra Fadnavis On Muralidhar Mohol Birthday | वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनीच साजरा व्हावा : देवेंद्र फडणवीस

भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिष्टचिंतन; रक्तदान शिबिरात 8 हजार 197 रक्तपिशव्या संकलित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Muralidhar Mohol Birthday | ‘वाढदिवस साजरा करताना लोकोपयोगी उपक्रम राबवणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण आपण समाजासाठी जीवन वाहून दिलेले असते. त्यामुळे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर (Blood Donation Camp Pune) आयोजित करणे, ही चांगली संकल्पना आहे’, अशा शब्दात रक्तदान महासंकल्प दिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर उपक्रमाचे कौतुक करत भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी एकूण ८ हजार १९७ रक्त पिशव्या संकलित झाल्या असून यंदा रक्तदान महासंकल्प दिवसाचे चौथे वर्ष होते. (Devendra Fadnavis On Muralidhar Mohol Birthday)

संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी काही रक्तदात्यांशी संवाद साधत मोहोळ यांचा अभिष्टचिंतनपर सत्कार केला. फडणवीस पुढे म्हणाले, ‘जीवनदान देण्यासाठी रक्ताची अतिशय गरज असते. आपल्याकडे अनेक वेळा रक्तपुरवठा अपुरा असतो आणि रक्तदाते शोधावे लागतात म्हणूनच हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहे. गरजूंसाठी रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन गरजेचे आहे’ (Devendra Fadnavis On Muralidhar Mohol Birthday)

अभिष्टचिंतनानंतर मोहोळ म्हणाले, वाढदिवस विधायक आणि सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा,
याची प्रेरणा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून मिळाली.
कोविड काळात अत्यंत निकडीच्या काळात सुरु झालेल्या रक्तदान शिबिराला आता लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे. ही निश्चितच समाधानाची बाब आहे. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात काम करणाऱ्यांना माझे आवाहन आहे, पुणे शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जावे’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil Visit Bajirao Peshwa Statue | बाजीराव पेशव्यांचा इतिहास तरुण पीढीला प्रेरणादायी – चंद्रकांत पाटील

Pune Police MCOCA Action | पुण्यातील सनी जाधव व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’!
पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 82 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA