Pune Rains | पुण्याचा पाणीप्रश्न मिटणार; चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rains | गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात पावसाने (Pune Rains) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र जलमय वातावरण झालं. दरम्यान, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल (रविवारी) दिवसभर आणि रात्रीही पावसाचा जोर ओसरला. मात्र घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत असल्याने, चारही धरणात पाणीसाठा वाढतोय.

 

खडकवासला धरण (Khadakwasla Dam) अजुनही शंभर टक्के भरलेले असल्याने धरणातून 1712 तर कालव्यातून 1005 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. या पावसाळ्यामध्ये आतापर्यंत मुठा नदीत (Mutha River) खडकवासला धरणातून 3.19 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण परिसरातही पाऊस चांगला झाला आहे. या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालीय. खडकवासला-2 मिमी, पानशेत -23 मिमी, वरसगाव- 20 मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात 35 मिमी पावसाची नोंद झालीय. तसेच, या 4 धरणांचा उपयुक्त पाणीसाठा 18.25 (62.62 टक्के) टीएमसी झाला आहे. (Pune Rains)

 

मागील 24 तासामधील हा पाऊस आहे. गतवर्षी याच दिवशी हा पाणीसाठा 9.73 (33.39 टक्के) होता. दरम्यान, पुण्याला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पुणेकरांची आणि जिल्ह्यातील नागरीकांची पाण्याची चिंता मिटली आहे. शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण यापूर्वीच 100 टक्के भरले होते.

 

धरणांतील पाणीसाठा – धरण उपयुक्त पाणीसाठा (TMC) टक्के –

खडकवासला – 1.94 टक्के, 98.40 टक्के

पानशेत – 6.40 टक्के, 60.07 टक्के

वरसगाव – 7.15 टक्के, 55.78 टक्के

टेमघर – 1.68 टक्के, 45.22 टक्के

पवना – 5.06 टक्के, 59.41 टक्के

 

Web Title :- Pune Rains | sufficient water stored in pune district dam for year khadakwasla and others

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indore-Pune Bus Accident | इंदूरहून पुण्याकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; 13 प्रवाशांचा मृत्यू

 

Attack On BJP Leader In Mumbai | मुंबईत भाजपच्या महिला नेत्यावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ

 

GST Rates Hike | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! जीवनावश्यक वस्तूंसोबत ‘या’ वस्तूही महागणार; जाणून घ्या