Pune Rape Case | दारुच्या नशेत महिलेवर बलात्कार, जंगली महाराज रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दारुच्या नशेत फूटपाथवर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार (Pune Rape Case) केल्याची घटना घडली आहे. ही घटना जंगली महाराज रोडवरील (JM Road) डेक्कन पीएमटी बस स्टॉप समोर गुरुवारी (दि.15) रात्री दोनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Rape Case)

याबाबत डेक्कन बस स्टॉपच्या मागील फुटपाथवर राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गोविंद रामा घारोळे (वय-23 रा. पुलाचीवाडी, डेक्कन) याच्यावर आयपीसी 376 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला एकमेकांच्या तोंड ओळखीचे आहेत. बुधवारी रात्री महिला डेक्कन पीएमटी बस स्टॉप मागील फुटपाथवर झोपल्या होत्या. त्यावेळी आरोपी दारूच्या नशेत त्याठिकाणी आला. त्याने नशेत असताना महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत महिलेने तक्रार देताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

बसमध्ये चढताना तरुणीसोबत गैरवर्तन

बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन तरुणीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला.
हा प्रकार गुरुवारी (दि.15) दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास पर्वती पीएमपीएमएल बस स्टॉप ते सहकारनगर पोलीस स्टेशन बसस्टॉप दरम्यान कात्रज बसमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत महात्मा फुले वसाहत येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमर परमेश्वर कदम (रा. आंबेडकर वसाहत, पर्वती) याच्यावर आयपीस 354 अ, 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आणि त्यांची आई कात्रज कडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना आरोपीने तरुणीला अश्लील स्पर्श केला.
तरुणीने बसमध्ये निट चढा असे सांगितले असता आरोपीने अश्लील बोलून तिच्या स्त्री मनास लज्जा उप्पन्न होईल
असे वर्तन केले. याबाबत तरुणीने आईला सांगितले. आईने आरोपीला नाव विचारले असता त्याने नाव सांगून तुम्हाला
काय करायचे ते करा असे म्हणत वाद घालून अंगावर धावून आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Alandi Accident News | भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणीचा जागीच मृत्यू; आळंदी परिसरातील घटना

पिंपरी : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून कोयत्याने तोडफोड

ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी 5 लाखांची लाच घेणारे मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात सात जण जखमी

Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क येथील फ्लॅटमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका