Pune : रिक्षा चोरणार्‍या सराईताला विश्रामबाग पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   रिक्षा चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून पावणे चार लाख रुपयांच्या चार रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

अशोक उर्फ संतोष चंद्रकांत ढेरे (वय 46, रा. वाघोली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

रिक्षा चालक संतोष जगताप यांची रिक्षा केळकर रोडवर असताना अज्ञातांनी चोरून नेली होती. मग त्यांनी पुणे पोलिसांच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर या आरोपीचा शोध सुरू केला जात होता. यादरम्यान विश्रामबाग पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यावेली त्यावेळी तो रामेश्वर चौकात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचत त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून विश्रामबाग, कोथरुड आणि बंडगार्डन येथील दोन असे चार गुन्हे उघडकीस आणत 3 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजय टीकोळे, उपनिरीक्षक राकेश सरडे यांच्या मार्गदनाखाली कर्मचारी बाबा दागडे, संजय दगडे, धीरज पवार, विठ्ठल खिलारे, हेमंत पालांडे, प्रशांत शिंदे, सत्ताप्पा पाटील, अभिजित गोंजारी यांच्या पथकाने केली आहे.