Pune Ring Road | पुणे : रिंगरोडसाठी 31 गावांमधील 411 हेक्टरचे होणार सक्तीचे भूसंपादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Pune Ring Road | पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हाती घेतलेल्या रिंगरोडसाठी पश्चिम भागातील ३५ गावांचे तर पूर्वमधील ४९ गावांचे भूसंपादन करायचे आहे. मात्र, पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी ऐच्छिक जमीन देण्यास विरोध केल्याने ३१ गावांमधील सुमारे ४११ हेक्टर क्षेत्राचे सक्तीचे भूसंपादन होणार आहे. (Pune Ring Road)

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ७२१ हेक्टर क्षेत्रापैकी २०५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण केले आहे. यासाठी सुमारे १३०० कोटी रुपयांचे वाटप केले. राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला १ हजार ३५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यापैकी १ हजार २१ कोटी रुपयांचे वाटप केले. (Pune Ring Road)

त्यानंतर ६३६ कोटी रुपये आणखी देण्यात आले. त्यात मावळ तालुक्यासाठी दोनशे कोटी, हवेलीसाठी चारशे कोटी रुपये तसेच भोर तालुक्यासाठी ३६ कोटी रुपयांचे वाटप केले. त्यापैकी हवेली तालुक्यात ५० कोटी, तर मावळ तालुक्यात २०० कोटींचे असे एकूण सुमारे १३०० कोटी रुपयांचे वाटप झाले.

पश्चिम भागातील ३१ तर पूर्व भागातील ४ गावांमध्ये सक्तीने भूसंपादन करण्यास जिल्हा दर समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. या करता भूसंपादनाचे निवाडे जाहीर केले जातील. यात प्रस्तावित ५१६ हेक्टर भूसंपादनापैकी पूर्व भागातील १०५ हेक्टर तर पश्चिम भागातील ३१ गावांमधील ४११ हेक्टर क्षेत्र आहे. यातील २०५ हेक्टर क्षेत्राचे संपादन ३१ गावांमधून पूर्ण झाले आहे.

बहुतांश गावांतील सरसकट क्षेत्राचे भूसंपादन झालेले नाही. त्यातील काही गटांतील क्षेत्र प्राप्त झाले असून उर्वरीत
क्षेत्र संपादित करणे बाकी आहे. त्यामुळे ३१ गावांतील ४११ हेक्टर क्षेत्राचे सक्तीने भूसंपादन होणार आहे,
असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

सक्तीचे भूसंपादन होणारी गावे

  • मुळशी (१३ गावे) –
    जवळ, केमसेवाडी, अंबडवेट, पिंपवली, पडघळवाडी, रिहे, मातेवाडी, घोटावडे, उरावडे, मारणेवाडी, आंबेगाव, मुठा, कातवडी.
  • मावळ (६ गावे) –
    उर्से, परंदवाडी, बेबळ ओव्हळ, धामणे, चांदखेड, पाचाणे
  • हवेली (१० गावे) –
    थोपटेवाडी, मांडवी बु. मोरदरवाडी, खामगाव, मावळ, वडदरे, मालखेड, सांगरून, भगतवाडी, कल्याण, रहाटवडे, बहुली
  • भोर (२ गावे) –
    कुसगाव, रांजे

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parth Ajit Pawar – PDCC Bank Pune | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी पार्थ पवार?