Pune River Rijuvenation Project | विकास आणि पर्यावरण रक्षण याकरिता पर्यावरण प्रेमी नागरिक आणि प्रशासनातील समन्वय वाढविण्याची गरज ! वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले – ‘वृक्षांच्या पुनर्रोपणाबद्दल महापालिकेचे अभिनंदन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune River Rijuvenation Project | नदीकाठ सुधार योजनेत झाडे काढणार आहेत. शासनाने निर्णय (Maharashtra State Govt) घेतला असून प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासनही झाडे वाचविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे आंदोलकांनी पॅनिक होउन चालणार नाही. आपल्याला पर्यावरण (Environment Lover) रक्षणासाठी दीर्घकाळ काम करावे लागणार असून प्रशासनासोबत समन्वयातून मार्ग काढण्याची गरज असल्याचे मत वृक्षप्रेमी (Tree Lover) अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी व्यक्त केले. (Pune River Rijuvenation Project)

 

पुणे महापालिकेच्यावतीने Pune Municipal Corporation (PMC) जुन्या पुणे मुंबई रस्त्याच्या (Pune Mumbai Road) रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. रुंदीकरणाच्या कामात येणारी खडकी (Khadki) येथील ६५ जुनी झाडे काढून रस्त्याच्या कडेला त्यांचे पुनर्रोपण करण्यात येत आहे. यामध्ये वडाच्या २२ झाडांचा समावेश आहे. मंगळवारी नदी काठ सुधार प्रकल्पाच्या बंडगार्डन (Bundgarden) येथे सुरू असलेल्या कामासोबतच वेताळ टेकडी येथील नियोजीत रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सयाजी शिंदे यांनी भेट दिली होती. आज त्यांनी खडकी येथे वटवृक्ष पुनर्रोपण सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. याप्रसंगी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade), उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे (Ashok Ghorpade PMC), पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दीनकर गोजारे (Gojare Dinkar PMC), उपअभियंता विनोद मुरमुरे (Vinod Murmure PMC), वृक्ष प्राधीकरणचे सदस्य संदीप काळे (Sandeep Kale) आदी उपस्थित होते. (Pune River Rijuvenation Project)

 

 

सयाजी शिंदे यांनी वटवृक्ष पुनर्रोपणाची माहिती घेतानाच ही झाडे जगली पाहीजेत यासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहीजेत अशी सूचना करताना पुनर्रोपणाबद्दल महापालिका आणि खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्डचे (Khadki Cantonment Board) अभिनंदनही केले. मुळात अनेकवर्षे वाढलेली झाडे कापण्यास आपला विरोधच असून यासंदर्भातील कायद्यात बदल करण्याची गरजही व्यक्त केली. एक झाड कापायचे असल्यास पाच झाडे लावण्याच्या कायदा रद्द करावा. त्याऐवजी त्या झाडाचे पुनर्रोपण करून पाच वर्षे देखभाल करून ते झाड जगवायचे बंधन घालायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणार्‍या नदीकाठ सुधार योजनेच्या कामाची पाहाणी केली. या प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली असून कामही सुरू झाले आहे. हे काम करण्यापुर्वी जायका प्रकल्प पुर्ण करून नदीतील पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. नदीच्या परिसरातील जीवसृष्टीची परिसंस्था टीकली पाहीजे. यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी देखिल बोलणे झाले आहे. त्यांनी नदीतील परिसंस्थेला पूरक असलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे येथील वृक्षतोडी संदर्भात आंदोलनकर्त्यांनी पॅनिक होउ नये. आपल्याला दीर्घ काळ काम करावे लागणार आहे. विकास आणि निसर्ग संवर्धन या दोन्हींवर एकत्रित काम करण्याची गरज आहे. यासाठी नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक वाढवावा लागणार आहे. वेताळ टेकडीला भेट दिली, परंतू फारशी माहीती घेतली नाही.

 

 

पुणे महापालिकेच्यावतीने ६५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत,
त्यामध्ये आपल्या संस्थेचे काय योगदान असेल याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले
की, शहरांमध्ये वृक्ष संगोपनाबाबत अधिक बोलले जाते, परंतू नागरिकांकडून म्हणावेसे प्रयत्न होत नाहीत.
त्यामुळे मी माळरानावरच वृक्ष संगोपनाच्यादृष्टीने अधिक मेहनत घेतो.

 

वृक्षतोड झाले की वाळवंट होण्याची सुरूवात होते, हे आपण राजस्थानमध्ये पाहीले आहे.
पुर्वी तेथे खूप झाडे होती. परंतू महापालिका झाडांचे पुनर्रोपण करून त्यांची जोपासना करत आहे, हे कौतुकास्पद आहे.
किमान पुढील हजार वर्षे पुण्याची आपली संस्कृती टीकून राहील असा यामुळे विश्‍वास वाटतो.

 

– भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक.

 

Web Title :- Pune River Rejuvenation Project | Need to increase coordination between environment loving citizens and administration for development and environmental protection! Tree-loving actor Sayaji Shinde said – ‘Congratulations to the Municipal Corporation for replanting trees’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalyukt Shivar Yojana Maharashtra | जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

Maharashtra Political News | शरद पवार भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच करु, भाजपच्या मंत्र्याचं सूचक विधान

Nira Ujwa Kalwa | नीरा उजव्या कालव्याची 19 जूनपर्यंत सलग दोन आवर्तने; कालवे सल्लागार समिती बैठकीत निर्णय