Pune RTO- Helmet Compulsory | पुण्यात हेल्मेट सक्ती? कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट बंधनकारक, पुण्यातील तब्बल 1744 कंपन्यांना नोटीसा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune RTO- Helmet Compulsory | पुणे आरटीओने जिल्ह्यातील सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्यास सक्ती करावी, याबाबत कंपन्यांना नोटीस बजावली आहे. मागील तीन महिन्यांपासून या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि कारवाई जाईल. तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम 129 आणि 194 (डी) अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत 1744 कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. (Pune RTO- Helmet Compulsory)

सीसीटीव्ही फुटेजसह हेल्मेटशिवाय कंपनीत येणाऱ्यांची यादी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 2022 आणि 2023 मध्ये पुणे जिल्ह्यात झालेल्या अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केल्यानंतर आरटीओ कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई होणार असल्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी आणि पादचारी यांचे प्रमाण जास्त आहे. या अपघातांमध्ये 70 ते 80 टक्के दुचाकी आणि पादचारी यांचा समावेश आहे. ही आकडेवारी चिंताजनक असल्याचे लक्षात आल्यावर पुणे आरटीओने पुण्यातील रस्त्यावर हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune RTO- Helmet Compulsory)

आरटीओच्या म्हणण्यानुसार, मोटार सायकल चालवताना हेल्मेट वापरणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत म्हत्त्वाचे आहे. दुचाकी अपघातात जखमी किंवा मृत्यू होणाऱ्यांमध्ये बहुतांश वाहनचालक हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात हेल्मेट वापरण्याबाबत व्यापक जनजागृती आणि अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. पुण्यातही काही दिवसांत हेल्मेट सक्ती करण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. परंतु कधी होणार यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती नाही.

आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील विविध MIDC मधील अनेक आयटी कंपन्या व इतर कंपन्यांनाही कामकाजाच्या आवारात
प्रवेश करताना हेल्मेट वापरणे अनिवार्य केले आहे. पुण्यात अपघाताचे प्रमाण वाढत असून हेल्मेट नसल्याने अनेकांना
जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये हेल्मेट सक्ती केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कारागृहाच्या आत कैद्याने घातला 27 लाखांना गंडा; मनीऑर्डर रजिस्टरमध्ये केल्या बनावट सह्या