Pune Crime News | कारागृहाच्या आत कैद्याने घातला 27 लाखांना गंडा; मनीऑर्डर रजिस्टरमध्ये केल्या बनावट सह्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने मनीऑर्डर रजिस्टारमध्ये खोट्या नोंदी करुन कारागृहातील कैद्यांच्या नावावर नोंदी करुन त्यांची चांदी केली. हा प्रकार तब्बल दोन वर्षांनी उघडकीस आला असून त्यात २६ लाख ६९ हजार ९११ रुपयांची शासनाची फसवणूक (Cheating Fraud Case) झाली आहे. (Pune Crime News)

सचिन रघुनाथ फुलसुंदर Sachin Raghunath Fulsundar (रा. येरवडा कारागृह – Yerwada Jail, मुळ रा. मोकास बाग, जुन्नर) याच्यावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तुरुंगाधिकारी बापुराव भीमराव मोटे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु़ रजि़ नं. ६५०/२३) दिली आहे़ प्रकार २०२१ ते आॅगस्ट २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिासंनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव येथील खुनाचा प्रयत्न करणे आणि बलात्कार करणे या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने सचिन फुलसुंदर याला २१ मे २००९ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो मे २००५ पासून येरवडा कारागृहात आहे़ कारागृह प्रशासनाने त्याला साफसफाईचे काम दिले होते. कारखाना विभागात तयार होणार्‍या वस्तू बाहेर पाठविण्यास मदतीचे बहाण्याने तो न्याय विभागात जात असे. तेथे कैद्यांना त्यांचे नातेवाईकांनी केलेल्या मनीऑर्डरचे रजिस्टर असते. कैद्यांना त्यांचे नातेवाईक कारागृहात दैंनदिन गरजा भागविण्यासाठी पैसे पाठवत असतात. त्याची नोंद या रजिस्टरमध्ये केलेली असते. त्यातील नोंदीनुसार कैंद्यांना कॅन्टीनमधून आवश्यक त्या वस्तू घेता येतात.

सचिन फुलसुंदर याने तेथील रजिस्टरमध्ये फेरफार करुन हुबेहुब खोटी दिनांक, खोटी स्वाक्षरी व खोटे हिशोब तयार केले.
त्यात कारागृहातील इतर कैद्यांच्या नावावर मोघम रक्कमा टाकून मनीऑर्डर आल्याची नोंद केली.
स्वत:च्या नावावरही रक्कमा टाकल्या. ही रक्कम त्यांनी कॅन्टीनमध्ये वापरुन शासनाची २६ लाख ६९ हजार ९११ रुपयांची
फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCOS Awareness Month | महिलांनो, ही 10 लक्षणे आढळल्यास करू नका दुर्लक्ष, असू शकतो पीसीओएस, कारण, रिस्क फॅक्टर्स जाणून घ्या

Kodo Millet Benefits | आकाराने छोटे, पण पोषक तत्वाचे पॉवरहाऊस, कोलेस्ट्रॉलपासून शुगरपर्यत 5 मोठ्या आजारात अमृत समान