Pune Rural Police | पुणे- सातारा महामार्गावर पट्टेरी वाघाची कातडी विक्री करणारी टोळी गजाआड

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) सारोळा येथील उड्डाण पुलाच्या खाली पट्टेरी वाघाची कातडीची तस्करी करुन विक्री करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch of pune rural police) बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या (Pune Rural Police) पथकाने वाघाच्या कातडीसह मुद्देमाल जप्त करुन चार जणांना अटक (Arrest) केली आहे.

दिनेश अशोक फरांदे (वय -38), हसन रज्जाक मुल्ला (वय -35 दोघे रा.मु पो ओझर्डे ता.वाई जि. सातारा), गणपत सदू जुनगरे (वय – 45 रा.देवदेव पो.मामुर्डे ता.जावळी जि. सातारा), सुनील दिनकर भिलारे
(वय – 52 रा.भिलार ता.महाबळेश्वर जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

Pune Rural Police | A gang selling tiger skins on the Pune-Satara highway has been arrested by pune rural police

 

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट (Senior Inspector of Police Padmakar Ghanwat) यांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की,
पुणे-सातारा रोडवर सारोळा ब्रीज खाली काही व्यक्ती पट्टेरी वाघाची कातडी तस्करी करुन विक्री (selling patteri tiger skin) करण्यासाठी येणार आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सारोळा उड्डाण पुलाखाली सापळा रचून वाघाची कातडी विक्रीसाठी आलेल्या चार जणांना ताब्यात घेतले.

 

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून 4 फूट लांबीचे, दीड फूट रुंदीचे, वरच्या जबड्यात 13 दात व खालच्या जबड्यात 16 दात असे एका पट्टेरी वाघाचे कातडे, एक दुचाकी व 4 मोबाईल फोन
असे एकूण 5 लाख 26 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
यासंदर्भात नसरापूर वन विभागाचे (Nasrapur Forest Department)
वन्य जीव रक्षक अधिकारी यांना माहिती देण्यात आली असून आरोपींना
रायगड पोलीस स्टेशनच्या (Raigad Police Station) ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते (Additional Superintendent of Police Milind Mohite) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक माने (API Mane), पोलीस उप निरीक्षक अमोल गोरे (PSI Amol Gore), पोलीस हवालदार ज्ञानेश्वर क्षीरसागर, पोलीस नाईक गुरू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूनम गुंड, चालक प्रमोद नवले यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Rural Police | A gang selling tiger skins on the Pune-Satara highway has been arrested by pune rural police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! खात्यात कमी बॅलन्स पडणार महागात, ATM वर व्यवहार फेल झाला तर लागेल ‘पेनल्टी’; ‘या’ पध्दतीनं टाळा

Crime News | ‘या’ कारणाने पतीने केली पत्नीची हत्या, रक्ताळलेल्या चाकुसह पोलीस ठाण्यात हजर

Protein Deficiency | सावधान ! ‘ही’ 8 लक्षणे दिसली तर समजून जा शरीरात आहे प्रोटीनची कमतरता; दुर्लक्ष करणे पडू शकते महागात