Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांनी 340 मद्यपींची उतरवली ‘झिंग’, नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यपान करुन वाहन (Drunk and Drive) चालवणाऱ्या विरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) मद्यपींवर दंडात्मक कारवाई केली आहे. मद्य प्राशन करुन तर्र झालेल्या 340 जणांची ग्रामीण पोलिसांनी झिंग उतरवली आहे. मद्यपींवर कारवाई करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

पुणे ग्रामीणचे (Pune Rural Police) पोलीस अधीक्षक अंकित गोयल (IPS Ankit Goyal) यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte) , अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे (Addl SP Anand Bhoite) यांनी पर्यटन स्थळी, गर्दीचे ठिकाणी मद्य प्राशन करुन गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवर तसेच मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

 

 

त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांकडून जिह्यात 14 ते 17 जुलै दरम्यान मद्यपी चालकांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये 340 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई (Punitive Action) केली आहे. या कारवाईत पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदवला होता.

 

पुणे ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पर्यटनस्थळी,
गर्दीच्या ठिकाणी गोंधळ घालू नका. तसेच मद्यपान करून वाहन चालवू नका.
मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक करावाई करण्यास सुरुवात झाली आहे.
नागरिकांनी मद्यापान करुन वाहन चालवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

Web Title : Pune Rural Police | Pune Rural Police Drunk and Drive Action On 340 Drivers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा