Opposition Parties Meeting | बंगळुरूमधील बैठकीत सीमाप्रश्न मांडणार की टोमणे मारणार? भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Opposition Parties Meeting | लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) काही महिने शिल्लक असताना सत्ताधारी आणि विरोधकांनी मित्रपक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज एनडीएची बैठक (NDA Meeting) होत आहे. तर विरोधकांची दुसरी बैठक बंगळुरूमध्ये होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), तसेच ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहेत. विरोधकांच्या या बैठकीवरुन (Opposition Parties Meeting) महाराष्ट्र भाजपचे (Maharashtra BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत खोचक सवाल केला आहे.

 

 

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी एकजूट करण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांनी बंगळुरूमध्ये बैठक (Opposition Parties Meeting) आयोजित केली आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे सोमवारी बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Congress Leader Sonia Gandhi) यांची भेट घेतली होती. या बैठकीवरुन भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला (Maharashtra Political News) आहे. तसेच कर्नाटकात भाजपचं सरकार (BJP Government in Karnataka) असताना सीमाप्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे उद्धव ठाकरे बंगळुरूमधील बैठकीत सीमाप्रश्न (Border Issue) मांडणार की टोमणे मारणार, असा खोचक सवाल बावनकुळे यांनी विचारला आहे.

 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोर्टाच्या निर्णयापर्यंत कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी विधान परिषदेत करणारे तुम्ही या बैठकीत सीमा प्रश्न मांडणार आहात की नाही? त्याबाबत काही भूमिका घेणार आहात की नाही? की, फक्त महाराष्ट्रात ‘टोमणे’ मारणार, हात वर करुन भाषणबाजी करणार आहात? की, पुन्हा मूग गिळून बसणार? असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना विरोध करण्याचा “समान किमान कार्यक्रम “घेऊन बंगरुळूमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आज आली आहे. हीच ती वेळ! उद्धवजी, ज्या ठिकाणी तुमच्या हजेरीत विरोधकांची ही बैठक होत आहे, तिथे हिंदू विरोधासाठी, हिंदू मनोधर्य खच्चीकरणासाठी सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार (Congress Government) टपून आहे.

 

भाजपाने सरकार असताना मंजूर केलेला” धर्मांतर विरोधी कायदा” नव्या काँग्रेस सरकारने रद्द केला.
तुम्ही मूग गिळून गप्प बसले.! कर्नाटक मंत्रिमंडळाने यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक
डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr. Keshav Baliram Hedgewar)
आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar)
यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
ज्या ठिकाणी ही बैठक होत आहे, तिथे राष्ट्रएकतेच्या विचारांवर घाला घालण्यात येत आहे.

तुम्ही सहभागी झाले! उद्धवजी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantra Veer Savarkar)
यांच्या विचारांचे पाईक आहोत, असे सांगणारे तुम्ही यावर काही बोलणार आहात की नाही? की, मूग गिळून बसणार?

 

Web Title :  Opposition Parties Meeting | will the border issue be raised or taunted in the meeting in
bangalore chandrasekhar bawankules question to uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा