Pune : खडकवासला गावच्या हद्दीत कोल्हेवाडी येथे शेडमध्ये राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, चौघांना अटक

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – खडकवासला गावच्या हद्दीत कोल्हेवाडी येथे शेडमध्ये राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून हवेली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गुरुवारी (दि. 13) दुपारी 2 च्या सुमारास पोलीसांनी ही कारवाई केली आहे. आरोपीकडून 41 हजारांची रोकड, 4 मोबाइल व तीन दुचाकी असा एकूण 2 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संजय लक्ष्‍मण निम्हण (वय 34,रा. कर्वेनगर, पुणे), सागर बळवंत कोल्हे (वय 34, रा. कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे), स्वप्नील राजाराम मते (वय 32, रा. खडकवासला, पुणे) आणि संजय रमेश चव्हाण (वय 24, रा.लमाणवाडी, खडकवासला) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गेल्या काही दिवसापासून कोल्हेवाडी, खडकवासला येथील एका हॉटेलच्या मागे शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नुसार पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस नाईक किरण बरकाले आणि संतोष भापकर यांच्या पथकाने येथे छापा टाकला. त्यावेळी तिथे जुगार अड्डा सुरू असल्याचे आढळले. पोलिसांनी आरोपींना रोख रक्कम व मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे. हवेली पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, सदर जुगार अड्ड्याला काही पोलिसांचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. संबंधित पोलिसांची या ठिकाणी नेहमी ये-जा असायची. मात्र या जुगार अड्ड्याला अर्थपूर्ण छुपी परवानगी देणाऱ्या पोलीसांची नावे समजू शकली नाहीत. याबाबत आता पोलीस तपासात काय सत्य बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.