Pune : एस.टी. महामंडळातील चालकानं लढवली शक्कल, दुसराच अडकला जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्य परिवहन विभागात नोकरी करणाऱ्या चालकाने डोळयांची तपासणी करतेवेळी दुसऱ्याच व्यक्तीला उभा करून शासनाची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, तो मुंबईत नोकरी करतो. पण, त्याला पुण्यात चेकअपसाठी पाठविल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी रतन संपती लगड (वय 41, बीड) याला अटक केली आहे. तर ठोकळ नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात सोमनाथ तिकोटकर (वय 44) यांनी तक्रार दिली आहे. हा सर्व प्रकार तीन दिवसांपूर्वी खडकी येथे असलेल्या व्हिजन नेक्स्ट फाउंडेशनच्या आय हॉस्पिटल येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे या हॉस्पिटल येथे असतात. दरम्यान रतन लगड हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परळ आगार येथे वाहक आणि चालक म्हणून नोकरीस आहेत. त्यांनी नोकरीच्या वेळी कागदपत्रे सादर केली आहेत. दरम्यान चालक म्हणून काम करताना त्यांनी डोळे दोषमुक्त असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वतःचे आधारकार्ड व वाहन परवाना हा आरोपी क्रमांक दोनशी संगनमत करून त्याचा फोटो या ठिकाणी जोडून तसेच त्या व्यक्तीला तपासणीसाठी उभाकरून डॉक्टर आणि शासनाची फसवणूक केली आहे. मुंबईत तपासणी झाल्यानंतर पुन्हा एका तपासणीसाठी त्यांना पुण्यात पाठवण्यात आले होते. मात्र तपासनीस पुण्यात आल्यानंतर हा प्रकार समोरे आला आहे. यानंतर गुन्हा दाखल करत त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षिक शिंदे या करत आहेत.