वढु बुद्रूक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भिडे गुरुजींची भेट 

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव भीमा  (ता. शिरूर) येथे  झालेल्या दंगलीनंतर राज्यभर शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरुजी यांचे नाव प्रत्येक गोष्टीत येत होते. भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) दंगलीपूर्वी सहा वर्षे या भागात आलेले नव्हते.  त्यानंतर अचानक  शनिवारी दुपारी भिडे गुरुजी वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी काही मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली.

भिडे गुरुजी हे तब्बल सात वर्षांनी श्री क्षेत्र वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी  भेट दिली.  शिक्रापूर पोलिसांना याबाबतीतली माहिती समजताच त्यांनी थेट छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाकडे धाव घेतली. या ठिकाणी भिडे गुरुजी थांबलेले पाहून त्यांना इथे थांबण्यास मज्जाव केला. या नंतर भिडे गुरुजी तात्काळ निघाले व ते वढु बुद्रुक येथील शिवाजी भोसकर यांच्या कुटुंबाला भेट देत ते  वाजेवाडी (ता.शिरूर) येथील काही दिवसांपूर्वी एका अपघातात मृत्यू पावलेले अमित तिखे यांच्या कुटुंबीयांना भेटले व मार्गस्थ झाले.

या संदर्भात  शिक्रापूर पोलिसांनीही वरील माहितीला दुजोरा दिला असून पोलिस निरीक्षक उमेश तावसकर म्हणाले, आम्ही छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचे बाबतीत संवेदनशील व सतर्क असून शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतली प्रत्येक गोपनीय माहिती संकलीत करुन त्यावर कार्यवाही करत आहोत.