Pune Shivaji Nagar Police | जबरी चोरी करुन कोयते बाळगणारी टोळी शिवाजीनगर पोलिसांकडून गजाआड (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल (Mobile Theft) जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी (Robbery In Pune) केल्याची घटना शिवाजीनगर परिसरात 14 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) अटक केली आहे. तर दोन अल्पयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मनपा येथील ब्रिजखाली करण्यात आली.

चंदु नंदू सरोदे (वय-19 रा. राज चौक, भिम ज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा), सिद्धेश विश्वास शेंडगे (वय-18 रा. सेवक चौक, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांना अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदार हे 14 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी तक्रारदार यांचा मोबाईल हिसकावून नेला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 392,34 सह आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या एका दुचाकी तिच्यावरील खुणे मुळे निश्चित केली. तसेच पोलीस अंमलदार प्रविण धडस, सुदाम तायडे, रुपेश वाघमारे यांना माहिती मिळाली की आरोपी मनपा येथील ब्रिजखाली येणार आहेत. पथकाने सापळा रचला असता आरोपी सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेल्या दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल, दोन कोयते, दोन दुचाकी असा एकूण एक लाख 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar),सह पोलीस आयुक्त प्रविण पवार (IPS Pravin Pawar),अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल (IPS Sandeep Singh Gill),सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश भिवरे, पोलीस अंमलदार राजकिरण पवार, रुपेश वाघमारे, सुदाम तायडे, प्रविण धडस, आदेश चलवादी, महिला पोलीस शिपाई स्वालेहा शेख यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

होंडा शोरुममध्ये चोरीचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला रंगेहात पकडले; वाघोली परिसरातील घटना

Wake Up Punekar Campaign | कोरेगांव पार्क, बंडगार्डन परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, वेकअप पुणेकर अभियानाला पहिले यश – माजी आमदार मोहन जोशी

Ritaa India Foundation | रिता इंडिया फाऊंडेशनच्या वतीने “वित्तीय गुंतवणूक आणि संधी” कार्यशाळा संपन्न

Maratha Reservation Bill | मोठी बातमी, मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर, पण मनोज जरांगेंनी व्यक्त केला संताप

Pune PMC News | देवाची उरूळी कचरा डेपोतील ‘बायोमायनिंग’ प्रकल्प महिन्याभरापासून बंद; निविदा प्रक्रियेच्या ‘घोळा’ मुळे पालिकेला ‘एनजीटी’चा सामना करावा लागणार !

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | ”सरकारने मराठा समाजाचा अपमान केलाय”, मनोज जरांगे आक्रमक, उद्या ‘या’ ठिकाणी निर्णायक बैठक