Pune SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात जमावबंदी, विद्यापीठात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune SPPU News | गेल्या काही दिवसांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पुणे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी विद्यापीठाच्या आवारात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार 7 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत पुणे विद्यापीठ (Pune SPPU News) परिसरात जमावबंदी लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी (Pune Police) दिला आहे.

विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा प्रकार, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे पुणे विद्यापीठात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले होते. त्यानंतर पोलिसांनी पुणे विद्यापीठाच्या आवारात जमावबंदी आदेश लागू केला आहे. (Pune SPPU News)

गेल्या काही दिवसांत विद्यापीठाच्या बाहेरील व्यक्ती, संघटना या विद्यापीठाची किंवा पोलिसांची पूर्वपरवानगी न
घेता निदर्शने, आंदोलने, मोर्चा आयोजित करुन, चिथावणी देणारी भाषणे, घोषणांद्वारे शांततेचा भंग करुन शैक्षणिक वातावरण बाधित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण होऊन भांडण, हाणामारी झाल्याचे निदर्शनास येते. या संदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूरक असे सौहार्दपूर्ण, शांततामय वातावरणाची आवश्यकता असल्याने विद्यापीठ आणि सभोवतालच्या 100 मीटर परिसरात निर्बंध घालणे जरुरीचे असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई

फौजदारी संहिता प्रक्रिया 1973 च्या कलम 144 नुसार विद्यापीठ आणि सभोवतालच्या 100 मीटर
परिसरात विद्यार्थ्यांशिवाय इतर व्यक्तींना एकत्र येण्यास, विद्यापीठात प्रवेश करण्यास प्रतिबंध, विद्यापीठ परिसरात
दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून विद्यापीठातील विद्यार्थी,
शिक्षक, कर्मचारी, पोलीस अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांना वगळण्यात आले आहे.
या आदेशाचा भंग केल्यास कलम 188 नुसार कारवाई करण्याचा इशारा आदेशाद्वारे देण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | सहकारनगरमधील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 54 वी स्थानबध्दतेची कारवाई

Multibagger Stock | ५ वर्षात मालामाल… एक लाख रुपयांचे केले १० लाख, जबरदस्त आहे ‘हा’ शेअर