Pune : वैदूवाडी-गोसावीवस्तीमधील नागरिकांना दिले सुग्रास भोजन – साहसी फाउंडेशनच्या अध्यक्षा मयुरी बामणे

पुणे : कोरोना महामारीमुळे शासनाने कडक निर्बंध जारी केले असून, अनेक व्यवसाय, उद्योग, कंपन्यांमधील कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे बेरोजगार झालेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. वैदूवाडी (गोसावीवस्ती) येथील वस्तीमध्ये जेवण दिले, त्यामध्ये दाल-खिचडी, गुलाबजाम आणि कोशिंबर असा मेनू होता. त्याचे पॅकिंग करून या वस्तीमधील 685 नागरिकांनी सुग्रास भोजनाचा आनंद लुटला, असे साहसी फाउंडेशनच्या अध्यक्षा मयुरी बामणे यांनी सांगितले.

बामणे म्हणाल्या की, साहसी फाउंडेशनच्या वतीने गोसावीवस्ती झोपडपट्टीमधील नागरिकांना अन्नदान करण्यात आले. यासाठी टू मॅड हॉटेलची मदत मिळाली. अमानोरामधील अऩ्नापूर्णा ग्रुपची महिला कार्यकर्ती शशि सिंघी यांच्याकडून आरोग्य तपासणी, अन्नदान करण्यासाठी सतत मदत होते. एक घास मायेचा म्हणत आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांकडून मोठी मदत मिळत असते. आज कोरोना महामारीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे निराधार आणि बेरोजगारांना मदतीची गरज आहे. मागिल वर्षी वस्तीमधील नागरिकांना अन्नधान्याचे कीट वाटप केले होते. आतापर्यंत या वस्तीतील नागरिकांना मदत केली जात असून, तयार जेवण देण्याचा हा उपक्रम वेळोवेळी राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम यश्सवी करण्यासाठी मृणाली पवार, रितेश चव्हाण, बबलू गिरी, करण धांदे, हृषिकेश बामणे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोठी मदत झाली. सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही उपक्रम राबविला आहे, असे त्यांनी सांगितले.