Pune Swargate MahaMetro Hub | महामेट्रोच्या स्वारगेट हबच्या कामांत हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आभाव

दोन दिवसांत उपाययोजना करा अन्यथा काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येतील; महापालिका आयुक्तांचा मेट्रो प्रशासनाला इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Swargate MahaMetro Hub | शहरातील प्रदूषण कमी (Pune Air Pollution) करण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी पुरेशा उपाययोजना केल्या जात नाहीत, असे समोर आले आहे. महामेट्रोच्यावतीने स्वारगेट येथे हब उभारणीच्या कामाच्या ठिकाणी राज्य प्रदूषण मंडळाच्यावतीने दिलेल्या निर्देशानुसार उपाययोजना केल्या गेल्या नसल्याची तक्रार आल्यानंतर महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना येत्या दोन तीन दिवसांत कामाच्या ठिकाणी २५ फूट पत्रे आणि हिरवी नेट लावावी अन्यथा काम थांबविण्याचा इशारा दिला आहे. (Pune Swargate MahaMetro Hub)

मागील काही आठवड्यात हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. हिवाळ्यात साधारणपणे वाहनांतील इंधनामुळे तसेच धुलीकणांमुळे प्रदूषणात भर पडून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. ही परिस्थिती प्रामुख्याने देशातील सर्वच मोठ्या शहरांमध्येच पाहायला मिळत आहे. दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्यानंतर केंद्र सरकारने सर्वच राज्य सरकारांना हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश तसेच गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने मागील आठवड्यात आदेश काढून या उपाययोजनांची तसेच गाईडलाईन्सची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेने मागील आठवड्यात तसे पत्र काढुन सर्वच बांधकाम व्यावसायीक, प्रकल्पांना नोटीसेस पाठवून बांधकामांच्या ठिकाणी वरील निर्देशानुसार केलेल्या अंमलबजावणीबाबत माहिती मागविली आहे. (Pune Swargate MahaMetro Hub)

दरम्यान शहरात फेज एक, दोन आणि तीनचे काम सुरू आहे. फेज १ अंतर्गत पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचे काम सुरू आहे. या अंतर्गत स्वारगेट येेथे मेट्रो हब उभारण्यात येत असून मेट्रो स्टेशनमध्ये बहुमजली व्यावसायीक इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी शहरातील सर्वात गर्दीचा जेधे चौक असून पीएमपी आणि एसटी स्थानकही येथेच असल्याने दररोज लाखांहून अधिक नागरिकांची ये जा सुरू असते.

लगतच सारसबाग, नेहरू स्टेडीयम असून येथेही नागरी वावर मोठ्या प्रमाणावर असतो.
मेट्रो हबच्या ठिकाणी बांधकामासाठीचा आरएमसी प्लांटही असून खडी,
सिमेंट वाहून आणणार्‍या वाहनांची संख्याही मोठी असते.
कामाच्या ठिकाणी उंच पत्रे लावण्यात आले आहेत, परंतू हिरवी नेट लावण्यात आलेली नाही.
या भव्यदिव्य प्रोजेक्टसाठी महामेट्रोने पर्यावरणीय दृष्टीने काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar)
यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी मेट्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी
संपर्क साधून तातडीने हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पत्रे तसेच ग्रीन नेट लावून घेण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन तीन दिवसांत या उपाययोजना न केल्यास मेट्रोचे काम बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा