Pune Talegaon Dabhade Crime | तळेगाव दाभाडे : ग्रामपंचायतच्या मागे सुरु होता गॅसचा काळाबाजार, एकाला अटक

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Talegaon Dabhade Crime | मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावच्या हद्दीतील ग्रामपंचायतीच्या पाठमागील बाजूस मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढत असताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी (Talegaon MIDC Police Station) एकाला अटक करुन 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.17) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास केली.

याबाबत पोलीस हवालदार सुरेस परशुराम जाधव (वय-42) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून बाबाजी आनंदराव पडवळ (वय-50 रा. दत्त मंदिरासमोर, नवलाख उंब्रे, ता. मावळ) याच्यावर आयपीसी 285 सह जिवनावश्यक वस्तुंचा कायदा 1955 चे कलम 3, 7 सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन 1884 चे कलमानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Talegaon Dabhade Crime)

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नवलाख उंब्रे ग्रामपंचायत कार्यालयामागील एका गाळ्यात छापा टाकला. त्यावेळी आरोपी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिफीलिंग सर्कीटच्या सहाय्याने गॅस अवैधरित्या दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरताना आढळून आला.

आरोपी बेकायदेशीररित्या कोणत्याही परवानगी शिवाय व कोणत्याही सुरक्षितते शिवाय भरलेल्या सिलेंडर मधील
गॅस रिकाम्या गॅस टाकीमध्ये भरत होता. यावेळी जिवीतास धोका होण्याची शक्यता असताना देखील आरोपी हा
बेकायदेशीर कृत्य करत असताना आढळून आले. त्याच्याकडून 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका