Pune : हडपसरमधील इन्कलाब संस्थेचे काम कौतुकास्पद – महापालिकेचे डॉ. दिनेश भेंडे

पुणे : कोरोना महामारीने जग हादरले आहे. त्यामुळे समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून नातेवाईकांसह समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी प्रत्येकजण पुढे येत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. हडपसर येथील इन्कलाब सामाजिक संस्थेतील युवकांनी स्वतःच्या खिशातून आणि लोकवर्गणी जमा करून एक लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन मशीन रुग्णांसाठी देण्याचा मोठेपणा दाखविला आहे, ही समाधानाची बाब आहे, असे मत महापालिकेचे डॉ. दिनेश भेंडे यांनी व्यक्त केले.

हडपसर भेकराईनगर येथील युवकांनी महापालिकेच्या गोंधळेनगर येथील बनकर कोविड सेंटरमधील रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेचे विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल काळे यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी इन्कलाब युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशुतोष शिपलकर व बनकर कोव्हीड सेंटरप्रमुख डॉ. पूजा गायकवाड, संस्थेचे युवक गणेश लोखंडे, संग्राम देशमुख, निशांत मेमाणे, स्वप्निल लोणकर, अक्षय कड आदी उपस्थित होते.

इन्कलाब संस्थेचे अध्यक्ष आशुतोष शिपलकर म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे भीती कमी होऊ लागली आहे. कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन कमतरता भासत आहे, कोरोनाच्या तिसरी लाटेत लहान मुलांना धोका दर्शवला आहे. त्यामुळे ऐनवेळी धावाधाव नको म्हणून ऑक्सिजन मशीनची मदत देऊन खारीचा वाटा उचलला आहे. समाजातील दानशूरांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, अशीही भावना त्यांनी सांगितले,