Pune : मध्यवस्तीतील शितळादेवी मंदिरात चोरी, चांदीचा मुकूट अन् दान पेटीतील रक्कम लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीमधील शितळादेवी मंदिरामधून चांदीचा मुकुट व दान पेटीतील चिल्लर चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात सुरू असलेल्या घरफोड्या कमी होत नसताना चोरटे मंदिरांना लक्ष करत असल्याचे दिसत आहे. काल सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी भरत कोटा (वय 40) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंदिरात पूजारी आहेत. दरम्यान मध्यरात्री मंदिर बंद असताना अज्ञात चोरटा आत घुसला. त्याने लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडले व आत गाभाऱ्यात प्रवेश केला त्यांनतर आतमधील चांदीचा मुकुट आणि दान पेटीमधील चिल्लर चोरुन नेला. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पण चोरट्याने सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील जाताना काढून नेला आहे. रविवारी सकाळी फिर्यादी हे मंदिरात आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही तपासत चोरट्याचा माग काढत आहेत. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.