Pune Traffic Police | लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe) यांची जयंती रविवारी (दि.1 ऑगस्ट) शहरात साजरी होत आहे. सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शहरातील विविध मंडळे व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते येणार आहेत. त्यामुळे जेधे चौक ते सारबाग (Jedhe Chowk to Sarbagh) हा रस्ता वाहतुकीसाठी बंद (No Entry) करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेच्या (Pune Traffic Police) वतीने करण्यात आले आहे. तसेच, पूरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी मार्ग हा आवश्यकतेनुसार दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत दुहेरी करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहर वाहतुक शाखेचे (Pune Traffic Police) पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (Deputy Commissioner of Police Rahul Shrirame) यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

 

– जेधे चौकातून सारसबाग चौकाकडे वाहनांना जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग –

1) जेधे चौकाकडून सिंहगड रोडला जाण्यासाठी होल्गा चौक (Holga Chowk) -मित्रमंडळ चौक-सावरकर चौक मार्गे सिंहगड रोड (Sinhagad Road)

2) सिंहगड रोडकडून स्वारगेटकडे जाण्यासाठी सावरकर चौक-मित्रमंडळ चौक-होल्गा चौक- जेधे चौक

– जेधे चौकातील वायजंक्शन (फ्लायओव्हर) वरून सारसबागेकडे वाहनांना जाण्यास प्रवेश बंद

पर्यायी मार्ग –  कात्रजकडून (Katraj) सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी ब्रीजवरून न जाता ब्रीजखालून लक्ष्मीनारयण चौकातुन (Laxminarayan Chowk) डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे

– वेगासेंटर ते सारसबाग पर्यंत ग्रेडसेपरेट मधून जाण्यास वाहनांना बंदी

पर्यायी मार्ग –  वेगासेंटर पासून घोरपडी उद्यान, राष्ट्रभुषण चौक पासून हिराबाग चौकाकडून इच्छित स्थळी जावे

या भागातील वाहतूक परिस्थिती नुसार आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. तरी वाहनचालकांनी उपलब्ध पर्यायी मार्गाच वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेने केले आहे.

 

Web Title : Pune Traffic Police | Changes in traffic in Pune on the occasion of Lokshahir Annabhau Sathe Jayanti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकारची खास योजना ! 210 रुपये करा जमा अन् घ्या दरमहा 5 हजाराचा फायदा

Online Game | 6 वी च्या मुलानं ऑनलाइन खेळला रक्तरंजित ‘गेम’, 40000 रुपये गमावल्यावर फास घेवून केली आत्महत्या; प्रचंड खळबळ

Flood Affected Area | राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचं सुमारे 1800 कोटींचं नुकसान