Pune Traffic Police | थकीत दंड कमी करण्याची वाहनचालकांना संधी, पुणे वाहतूक पोलिसांकडून ‘जिल्हा हेल्प डेस्क’ सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून (Pune Traffic Police) जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी ‘जिल्हा हेल्प डेस्क’ (District Help Desk) बुधवारपासून (दि. 22) सुरू केला आहे. वाहनचालकांवर असलेला थकीत दंड तडजोडीत कमी करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी येरवडा येथील वाहतूक उपायुक्त कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे (Pune Traffic Police) पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijay Kumar Magar) यांनी केले आहे.

वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,पुणे या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश 1 के.पी. नांदेडकर (District Judge K.P. Nandedkar) व प्रभारी मुख्य जिल्हा न्यायाधीश, सचिव सोनल पाटील यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये बुधवारपासून (दि.22) येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात प्रलंबित वाहतूक चलनांच्या (Vehicle Challan) तडजोडीनंतर दंडातील सवलीबाबत माहिती देण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून 9 डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालीमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड तसेच पुणे हायवे अखत्यारितील प्रलंबित खटले तडजोडीने मार्गी लावण्यात येणार आहेत. वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाचे प्रमाण जास्त आहे. थकीत दंडाची रक्कम कमी करणे,
तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे.
वाहनचालक/मालक यांनी या सुविधेचा लाभ घेऊन तडजोडीत दंड कमी करुन घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune Traffic Police)

येरवडा येथील वाहतूक शाखेच्या उपायुक्त कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या मदत केंद्राचे
कामकाज सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे. प्रलंबित खटला,
थकीत दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.
वाहनचालकांना दंडाच्या रक्कमेतून सूट देण्यात येणार आहे.
या हेल्पडेस्क अंतर्गत पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड यांच्याकडील
प्रलंबित वाहतूक चलनांच्या तडजोडीसाठी वेगवेगळे टेबल लावण्यात आले आहेत.

पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्या संकल्पनेतून व सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जिल्हा हेल्प डेस्क’ ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
त्याचा जास्तीत जास्त वाहनचालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कराराप्रमाणे सदनिका न देता गृहरचना संस्थेच्या सभासदांची फसवणूक; 6 जणांवर FIR