Pune Traffic Police | पुणे वाहतूक पोलिसांनी फिरवला 571 बुलेटच्या सायलेन्सरवर बुलडोजर (रोड रोलर), सायलेन्सर चक्काचूर (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police | मागील काही महिन्यांपासून पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करुन कर्णकर्कश फटाक्यांचे आवाज काढून ध्वनिप्रदूषण केले जात आहे. अशा प्रकारे ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध पुणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांकडून बुलेटचे 571 सायलेन्सर जप्त केले आहेत. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. (Pune Traffic Police)

बुटेलच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करुन त्यातून फटाक्यांचे आवाज कढले जातात. पुणे शहरामध्ये बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करुन दुचाकी चालवणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत 571 मोटार सायकलवर कारवाई करुन सायलेन्सर काढून घेतले आहेत. ही कारवाई विमानतळ, हांडेवाडी, कोरेगाव पार्क, डेक्कन, भारती विद्यापीठ, तसेच हडपसर वाहतूक विभांतर्गत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत.

पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत अशा फेरबदल केलेल्या सायलेन्सर लावलेल्या बुलेट चालवताना वाहनचालक
आढळून आल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना अशा वाहन चलकांची तक्रार करता यावी यासाठी वाहतूक पोलिसांनी 8087240400 हा व्हॉट्सअॅप क्रमांक कार्यान्वीत केला आहे. नागरिकांनी या क्रमांकावर तक्रार करावी अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.

जप्त करण्यात आलेल्या सायलेन्सरवर पुणे वाहतूक पोलिसांनी बुलडोजर फिरवला असून सायलेन्सरचा चक्काचूर झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray | बाळासाहेबांना भारतरत्न घोषित करण्याची राज ठाकरेंची मागणी, म्हणाले – ”तमाम हिंदूंची अस्मिता जागृत…”

जास्तीचा फायदा करुन देण्याच्या बहाण्याने 15 जणांची 8 कोटींची फसवणूक, आरोपीला हिंजवडी पोलिसांकडून अटक