Pune Traffic Police | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे स्टेशन, आरोरा टॉवर्स, विश्रांतवाडी आणि दत्तवाडी परिसरातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharatratna Dr Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त (Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022) १४ एप्रिलला पुणे स्टेशन (Pune Railway Station), आरोरा टॉवर्स (Arora Tower) , विश्रांतवाडी (Vishrantwadi) आणि दत्तवाडी (Dattawadi) परिसरातील वाहतुकीमध्ये बदल (Pune Traffic Police) करण्यात आला आहे. १४ एप्रिलला वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) यांनी केले आहे. (Traffic changes in Pune railway station, Arora Towers, Vishrantwadi and Dattawadi areas on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2022)

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यासाठी नागरिक मिरवणुकीने येत असतात. या कालावधीत रस्त्यांवर अबालवृद्धांची मोठ्याप्रमाणावर गर्दी असल्याने पुतळ्यांच्या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी आरटीओ चौकातून जहांगीर हॉस्पीटलच्या दिशेने जाणार्‍या मार्गाचा वापर करावा. जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाण्याचा मार्ग बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी किराड चौकातून नेहरू मेमोरियल मार्गे जावे. नरपतगिरी चौक तसेच पुणे स्टेशन येथून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. (Pune Traffic Police)

 

आरोरा टॉवर्स येथील कोयाजी रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे बंद ठेवण्यात येणार असून एसबीआय हाउस चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून आरोरा टॉवर्सकडे जाण्यास बंदी राहील.
विश्रांतवाडी येथे एअरपोर्ट, टिंगरेनगरकडे जाणार्‍या वाहनांनी मेंटर कॉर्नर येथे उजवीकडे
वळून कॉमर्स झोन येथून टिंगरेनगर मार्गे अथवा जेल रोडचा वापर करावा. बोपखेल,
दिघीकडे जाणार्‍या वाहनांना शांतीनगर चौकातून डावीकडे वळून पर्यायी कच्च्या रस्त्नाने मासे मार्केट रस्त्यावरून कळसकडे जाता येईल.
सारसबाग येथील सावरकर चौकातून सिंहगडकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच सिंहगड रस्त्यावरील आशा चौकातून सावरकर चौकाकडे जाणारी वाहतूकही बंद राहील.
वाहनचालकांनी सारसबाग चौक, सणस पुतळा, कल्पना हॉटेल येथून मांगीरबाबा चौक ,
सेनादत्त पोलिस चौकी मार्गे इच्छितस्थळी जावे. सिंहगड रस्त्याने स्वारगेटकडे येणार्‍या वाहनांसाठीही हाच मार्ग राहील,
असे राहुल श्रीरामे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Web Title :- Pune Traffic Police | Traffic changes in Pune railway station, Arora Towers, Vishrantwadi and Dattawadi areas on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2022


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Raut On Load shedding | राज्यातील वीज दर वाढणार?, लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले….

MLA Rohit Pawar | शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’वरील हल्लाप्रकरणी रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘पोलिस प्रशासन…’

Bitcoin Case Pune | बिटकॉईन तपासातील सहभागी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी